JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Nagpur News : महाराष्ट्र पोलिसांनी मान शरमेने खाली, पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा

Nagpur News : महाराष्ट्र पोलिसांनी मान शरमेने खाली, पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा

गेल्या 24 तासात सहा पोलिसांचे निलंबन करण्यात आले असून त्यात दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तुषार कोहळे, प्रतिनिधी नागपूर,14 मार्च : नागपूरमध्ये (Nagpur) घडणारे सततचे हत्यासत्र थांबण्याचे नाव नसताना आता नागपूर पोलिसांचे (Nagpur Police) कारनामे पुढे येत आहे. त्यामुळे फक्त नागपूर पोलिसांनीच नाही तर महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police) मान शरमेने खाली गेली आहे. गेल्या 24 तासात सहा पोलिसांचे निलंबन (Suspension) करण्यात आले असून त्यात दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका घटनेत नागपूरमध्ये अरविंद भोळे (Arvind Bhole) या पोलीस निरीक्षकावर बलात्कार चा गुन्हा दाखल झाला असून त्यांचे निलंबन करण्यात आले. भोळे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विधवेशी लग्न करून शारीरिक शोषण केल्याने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर होते. झाडातून घळाघळा वाहतंय पाणी, झाड रडत असल्याची गावकऱ्यांची भावना; पाहा VIDEO दुसरी घटना मानकापूर पोलीस ठाण्यातील आहे. जखमी वृद्ध रस्त्यावर पडून असतांना घटनास्थळावर न पोहचणे त्यानंतर त्या वृद्धाचा मृत्यू होणे त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी चौघांचे निलंबन करण्यात आले त्यात एक पोलीस उपनिरीक्षक आहे. तर तिसरी घटना यशोधरा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व उप पोलीस निरीक्षक यांनी आत्महत्येच्या प्रकरणात उकळलेले खंडणी त्यामुळे एका उप निरीक्षकाला अटक करण्यात आली. त्यामुळे नागपूर पोलीस दलात चालंय तरी का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतात येणार डिजिटल चलन, RBI ने दिले महत्त्वाचे संकेत दरम्यान, मुंबईमध्ये स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणी मुंबई पोलीस  दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze arrested) यांना अखेर NIA कडून अटक करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मुंबईतील एका हाय प्रोफाइल परिसरात गाडीत स्फोटकं सापडलेल्या प्रकरणात वाझे यांची चौकशी करून त्यांना अटक केली गेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या