JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Video : नागपुरात नमाज अदा करण्यासाठी गुडघ्यावर बसला तो उठलाच नाही; मशिदीतच सोडला जीव

Video : नागपुरात नमाज अदा करण्यासाठी गुडघ्यावर बसला तो उठलाच नाही; मशिदीतच सोडला जीव

यावेळी मशिदीत मोठी गर्दी होती. सर्वजण नमाज अदा करीत होता. तो आला अन्..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवी गुलकरी/ नागपूर, 30 सप्टेंबर : नमाज अदा करून असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमधील जाफर नगर मशिदीत ही घटना घडली आहे. गुरुवारी या मशिदीत एक व्यक्ती नमाज अदा करीत होता. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याला वाचवण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले, मात्र दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला. नागपूरच्या जाफर नगर मशिदीत एक व्यक्ती नमाज अदा करीत होता. अचानक तो खाली कोसळला. मृत व्यक्ती अकोला जिल्ह्यातील आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी होता. उपचारासाठी तो नागपूरला आला होता. उपचारासाठी तो नागपूरमधील आपल्या नातेवाईकांच्या घरी राहत होता. गुरुवारी नमाज अदा करीत असताना तो अचानक खाली कोसळला, आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

नमाज अदा करीत असताना इतरांनी जेव्हा त्याला खाली कोसळताना पाहिलं तर सारेजण धावले. त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. नमाजादरम्यान घडलेला हा सर्व प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जो पाहून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या