(प्रातिनिधीक फोटो)
नवी दिल्ली, 6 मे : अमन विहारमध्ये एका भावाने आपल्या मोठ्या भावाची गळा आवळून हत्या केली. इतकच नाही हे सर्व केल्यानंतर कफनने भावाचा मृतदेह गुंडाळून खूप रडला. यानंतर शेजारच्यांनी गोळा करून अंत्यसंस्काराची तयारी केली. नशेच्या अवस्थेत भावाचा मृत्यू झाल्याची खोटी कथाही सांगितली. स्मशानात चितेवर मृतदेह (Killed Brother) ठेवला. मात्र ऐन वेळी पंडीतने मृतदेहाच्या गळ्याभोवतीचे निशाण पाहिले आणि पोलिसांना कॉल केला. पोलीसही घटनास्थळी हजर झाले आणि या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला. गळ्याभोवती जखमा.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिलच्या सायंकाळी साधारण 5 वाजता विजय विहार स्मशान भूमीच्या केअर टेकरकडून पोलिसांना कॉल आला. यानुसार, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहाच्या गळ्यावर निशाण असून त्याचा पोस्टमार्टमही करण्यात आलेला नाही. यानंतर पोलीसही स्मशानभूमीत पोहोचले. यानंतर तेथील लोकांकडून चौकशी केली. मृत व्यक्तीचा भाऊ प्रदीपचीही चौकशी केली. त्याने सांगितलं की, भावाची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, म्हणून त्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस त्याच्या घरीही गेले. मात्र येथे कुठेच आत्महत्येचे पुरावे सापडले नाही. शेवटी प्रदीपवर संशय बळावला. हे ही वाचा- सेल्फीकरता बुरखा हटवाल तर… मुस्लीम संघटनांचा महिलांविरोधात अजब फतवा प्रदीप हा एका फॅक्टरीत टेलरिंग मास्टर आहे. मृत राजेश याला दारूच व्यसन होतं. तो आपल्या आईलाही मारहाण करीत होता. त्याच्या रागीट स्वभावामुळे दोन्ही भावांच्या पत्नी सासरसोडून निघून गेल्या होत्या. एके दिवशी प्रदीप आणि राजेश यांच्यामध्ये वाद झाला. प्रदीपने मित्र विक्कीच्या मदतीने दारू खरेदी केली आणि भावाला खूप दारू पाजली. नशेच्या अवस्थेत प्रदीपने नाड्याने भावाचा गळा आवळला. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर आत्महत्येचं खोटं कारण सांगून सर्वांसमोर रडल्याचं नाटक केलं, आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचीही घाई केली. मात्र स्मशानभूमीतील पंडिताने फोन केल्यामुळे सत्य समोर आलं.