मुंबई : एकमेकांवर प्रेम असूनही लग्नासाठी मात्र तो तयार नव्हता. अनेक स्वप्न दाखवून त्याने साथ सोडली आणि घात केला. लग्नासाठी टाळाटाळ केली आणि ऐकत नाही म्हटल्यावर प्रियकराने प्रेयसीचाच काट काढून ४ वर्षांचा रिलेशनपला कायमचं संपवलं. लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने कायमचा काटा काढला आहे. प्रेमात एवढा मोठा धोका मिळेल असा विचारही तिने स्वप्नात केला नसेल. ३१ जुलै रोजी प्रियकर अभिषेकने आपल्या प्रेयसीला ग्रँटरोडवर बोलवलं. दोघांनी तिथून एकत्र प्रवास केला. प्रियकराने भाईंदर खाडी पाहण्यासाठी प्रेयसीला रुळावरून चालत नेलं. ती बेसावध आहे हे पाहून त्याने तिला खाडीमध्ये ढकललं आणि तो फरार झाला. हे सगळं प्रकरण तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर समोर आलं. तरुणीच्या कुटुंबाने अंकिता गायब असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू झाला. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपी अभिषेकला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने हे सत्य सांगितलं. अभिषेक आणि अंकिता एकमेकांना ओळखायचे. त्यांच्यातली मैत्री वाढत गेली. २०१६ मध्ये त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. अंकिताला लग्न करायचं होतं. मात्र आरोपी अभिषेक लग्नाची गोष्ट आली की विषय बदलायचा किंवा टाळायचा. या सगळ्यामुळे त्यांच्यात वादही सुरू झाले होते. लग्नासाठी अंकिताने कित्येकदा बोलण्याचा प्रयत्न केला. अखेर न राहून तिने धमक्या देण्यास सुरुवात केली. सतत लग्नाचा तगादा आणि धमक्यांचा राग मनात ठेवून आरोपी अभिषेकने अंकिताचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. त्याने भाईंदर खाडीत तिला ढकलून दिलं.