JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मुंबई : सरपंच होण्यासाठी आधी झाला चोर; मुख्यमंत्र्यासह बिल्डरांच्या घरात काम केलं अन्...

मुंबई : सरपंच होण्यासाठी आधी झाला चोर; मुख्यमंत्र्यासह बिल्डरांच्या घरात काम केलं अन्...

अखेर मुंबई पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 22 मार्च : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh News) गावाच्या सरपंचाची निवडणूक लढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरापासून बिल्डरांच्या घरात नोकरी करण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून अटक केली आहे. पकडलेल्या आरोपीचं नाव जवाहर मंगरू प्रसाद पांडेय असं आहे. तो 38 वर्षांचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवलीतील एका बिल्डरच्या घरात नोकरी करण्याच्या बहाण्याने गेला होता. नोकरीसाठी मालकाला बनावटी आधार कार्ड दाखवून कामावर रुजू झाला. 1 जानेवारी ते 23 जानेवारी 2022 पर्यंत, असे 23 दिवस नोकरी केल्यानंतर आरोपीने दोन साथीदारांसह मिळून 23 जानेवारी 2022 रोजी आपल्या मालकाच्या घरातून 17 लाख रुपये चोरी करून फरार झाला. ज्यात सोनं, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने होते. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितलं की, त्याचं गावातील सरपंचासोबत काही कारणावरुन वाद झाला होता. ज्यानंतर त्याने स्वत:च सरपंचपदाची निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली होती. हे ही वाचा- तीन आरोपी 3 वर्षांपासून होते फरार; एकाच रात्रीत झाला गेम ओव्हर, नांदेडातील घटना आरोपी निवडणूक लढवण्यासाठी पंजाब, हरयाणा, गुडगाव, दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या हाय प्रोफाइल लोकांच्या घरात नोकरी करण्याच्या बहाण्याने चोरी करीत होता. आरोपीने 2016 मध्ये मुख्यमंत्र्याच्या घरातही चोरी केली होती, मुंबईसह अनेक राज्याचे पोलीस आरोपीचा शोध घेत होते. सध्या कांदिवली पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरी केलेल्या 13 लाखांचे दागिने जप्त केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या