JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Navneet Rana: नवनीत राणा अडचणीत?, संजय राऊतांच्या आरोपांनंतर कर्ज प्रकरणाची चौकशीची शक्यता

Navneet Rana: नवनीत राणा अडचणीत?, संजय राऊतांच्या आरोपांनंतर कर्ज प्रकरणाची चौकशीची शक्यता

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा यांनी घेतलेल्या या कर्ज प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 एप्रिल : हनुमान चालिसा पठणच्या मुद्द्यावरुन झालेल्या संघर्षानंतर अमवरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला पण मुंबई पोलीस आयुक्तांनी नवनीत राणा या पोलीस स्टेशनमध्ये बसून चहा-पाणी घेत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आणि नवनीत राणा यांच्या आरोपांना उत्तर दिलं. त्यानंतर थोड्याच वेळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी एक ट्विट करत नवनीत राणा यांच्यावर आरोप केला. नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज युसूफ लकडावाला (Yusuf Lakadawala) याच्याकडून घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. आता हेच कर्ज नवनीत राणा यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. युसूफ लकडावाला याचे दाऊदच्या डी कंपनीशी संबंध असल्याचा आरोप आहे. दाऊदचा हस्तक असलेल्या याच युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. या संदर्भात नवनीत राणा यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सुद्धा माहिती दिली होती. त्याचेच कागदपत्रे संजय राऊतांनी ट्विट केले.

नवनीत राणा यांचे थेट युसूफ लकडावाला याच्यासोबत संबंध होते तर हे नेमके कशाप्रकारे संबंध आहेत? इतकी मोठी रक्कम राणा यांच्या बँक खात्यात कशी आली? हा सर्व चौकशीचा विषय आहे. कारण, याच पार्श्वभूमीवर राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दाऊदच्या संबंधित लोकांसोबत व्यवहार केल्याप्रकरणी जर ईडीने अटक केली आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांची चौकशी ईडी करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणात चौकशी करणार की नाही याबाबत अद्याप माहिती नाहीये. मात्र, राज्याचे ईओडब्ल्यू विभाग नवनीत राणा यांच्या या व्यवहाराची चौकशी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. EOW कडे अधिकृतपणे तक्रार करुन दाऊद कनेक्शन शोधण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. युसूफ लकडावाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने अटक केली होती, त्यावेळी त्याचे डी गँग अर्थात अंडरवर्ल्डशी संबंध होते. मग या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पुराव्यासह फोटो सुद्धा ट्वीट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या