JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेलं अन्.. चारित्र्याच्या संशयातून प्रियकराचं धक्कादायक पाऊल

फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेलं अन्.. चारित्र्याच्या संशयातून प्रियकराचं धक्कादायक पाऊल

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात राहणारी 21 वर्षीय तनू कुर्रे ही रायपूरमधील एका खासगी बँकेत काम करत होती. ती 21 नोव्हेंबरला बॉयफ्रेंड सचिन अग्रवालसोबत बालनगीरला निघाली होती. प्रियकराने तनू कुर्रेला जंगलात नेऊन तिची हत्या केली. त्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला.

जाहिरात

फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेलं अन्..

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोरबा, 2 डिसेंबर : दिल्लीतलं श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या देशभर चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा अशीच एक घटना घडली आहे. छत्तीसगडमधल्या रायपूर इथल्या तरुणानं आपल्या बँकर प्रेयसीची जंगलात नेऊन गोळ्या घालून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आरोपीनं प्रेयसीचा मृतदेह जाळला. आरोपी तरुणानं प्रेयसीला फिरण्याच्या बहाण्यानं रायपूरहून ओडिशात नेऊन हे हत्याकांड घडवून आणलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. हत्या झालेल्या तरुणीचं नाव तनू कुर्रे असं असून, तिच्या प्रियकराचं नाव सचिन अग्रवाल असं आहे. 21 वर्षांची तनू ही छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातली रहिवासी होती. ती रायपूरमधल्या एका खासगी बँकेत काम करत होती. 21 नोव्हेंबर रोजी आपला प्रियकर सचिन अग्रवालसोबत बालनगीरला फिरण्यासाठी गेली होती. यानंतर तनूच्या नातेवाईकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र फोनवर तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तनूशी खूप दिवस संपर्क न झाल्यानं तिच्या नातेवाईकांनी रायपूर पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, रायपूर पोलिसांना बालनगीरमध्ये एक जळालेला मृतदेह आढळला. फोटोच्या आधारे कुटुंबीयांनी तनूचा मृतदेह ओळखला. यानंतर बलनगीर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्वांत आधी तनूचा प्रियकर सचिन अग्रवालचा शोध सुरू केला. तनूच्या कुटुंबीयांचा आरोप आहे, की ओडिशामध्ये पोहोचल्यानंतर सचिन तिला घरच्यांशी बोलूही देत नव्हता. तनूच्या हत्येनंतर सचिन तिच्या कुटुंबीयांशी मेसेज करून त्यांची दिशाभूल करत होता. सचिन सतत आपली जागा बदलत होता. फोन लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. वाचा - नार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, तनूचे अन्य कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय असल्याने त्याने हा खून केला. तो फिरायला जाण्याच्या बहाण्याने तनूला बालनगीरला घेऊन गेला होता. तिथे जंगलात नेऊन त्याने तिची हत्या केली आणि नंतर मृतदेहावर पेट्रोल शिंपडून जाळून टाकलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये आफताब पूनावाला नावाच्या तरुणानं आपल्या प्रेयसीची अशाच प्रकारे हत्या केली होती. त्यानं आपली लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून करून तिच्या मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे केले होते. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या