श्रद्धाच्या थेरपिस्टने वाचला आफताबच्या अत्याचाराचा पाढा
श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.
आता तिची थेरपिस्ट पूनम हिने धक्कादायक खुलासा केले आहेत.
आफताब जबरदस्तीने श्रद्धाला मांसाहार करायला लावायचा.
एकदा श्रद्धा तिच्याकडे आली तेव्हा तिच्या कपाळावर, गालावर आणि मानेवर मारहाण केल्याच्या खुणा होत्या.
आफताबचे आई-वडीलही तितकेच दोषी असल्याचं पूनमने म्हटलं आहे.
जेव्हा श्रद्धा त्याच्या आई-वडिलांकडे तक्रार करायची, तेव्हा ते तिला माफ करण्याची विनंती करत होते.
मेहरौलीच्या जंगलात पोलिसांना जबड्याचा भाग सापडला. तो श्रद्धाचा असावा असा पोलिसांना संशय आहे.
मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याने दात आणि जबडा तोडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 17 हाडे सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.