नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) एक खबळजनक घटना समोर आली आहे. 17 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीने (Minor girl) लग्नाला नकार दिला (refused to marry) म्हणून संतापलेल्या युवकाने तिची निर्घृण हत्या (Murder) केली आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. दिल्ली पोलिसांनी मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलगी आपल्या कुंटुंबासोबत दिल्लीतील बेगमपूर (Begumpur) परिसरात राहते. तर आरोपीही त्याच्या कुटुंबीयांसोबत तिच्याच शेजारी राहतो. शुक्रवारी आरोपी लईक खानने पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर हातोड्याने (Attacked with hammer ) हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित मुलीचा जागीचं मृत्यू (Death) झाला आहे. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत मुलीचं कुटुंब शेजारी राहत होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबात चांगला परिचय होता. तर आरोपी लईक खान या अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी दबाब टाकत होता. पण त्याच्या या मागणीला मृत मुलीचा आणि तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या लईक खानने पीडितेची निर्घृण हत्या केली आहे. हे ही वाचा- पुणे हादरलं! गुंडांच्या टोळक्याचा तरुणावर तलवार-कोयत्याने जीवघेणा हल्ला दोघांचा धर्म वेगळा असल्याने संप्रदायिक तणाव रोखण्यासाठी या परिसरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. तसेच पोलिसांनी संबंधित मुलीचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.