JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड लव्ह जिहादचा आरोपी, खा. बोंडे यांचा आरोप, म्हणाले एका विवाहितेला..

उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड लव्ह जिहादचा आरोपी, खा. बोंडे यांचा आरोप, म्हणाले एका विवाहितेला..

अमरावती येथे 21 जून रोजी उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. याबद्दल भाजप खासदार अनिल बोंडे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 5 जुलै : उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या होण्याच्या बरोबर एक आठवड्यापूर्वी अमरावतीमधील (Amravati Crime News) उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी भाजपामधील निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या बाजूनं पोस्ट लिहिली होती. याच कारणांमुळे कोल्हे यांची हत्या झाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावर आता खासदार अनिल बोंडे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड लव्ह जिहादचा आरोपी असल्याचं बोंडे यांनी म्हटलं आहे. हिंदू मुलीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार : बोंडे उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड लव्ह जिहादचा आरोपी असल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय. ते म्हणाले, की या हत्याकांडाचा मास्टरमाइंड शेख इरफाण याने इंदोर येथे एका लग्न झालेल्या हिंदू मुलीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्या हिंदू मुलीला जबरदस्ती बुरखा घालायला लावला. मध्यप्रदेश पोलिसांनी शेख इरफानवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र, अमरावती पोलिसांनी शेख इरफानवर लक्ष न ठेवल्याने उमेश कोल्हे यांचा खून झाला. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस इरफानला संरक्षण देत असल्याचा आरोपही बोंडे यांनी केला आहे. पोलिसांनी अमरावतीत तातडीने कोंबिंग ऑपरेशन राबविले पाहिजे, अशी मागणी खासदार बोंडे यांनी केली आहे. तीन मुलींची आई गेली प्रियकरासोबत राहायला, पतीने गावकऱ्यांसोबत मिळून केलं… मुख्य सूत्रधाराला 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ऊर्फ इरफान खान याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला शनिवारी रात्री नागपुरातून अटक करण्यात आली होती. आरोपीला अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करताना अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात आरोपीला नेण्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने रविवारी सकाळी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशी केली. न्यायालयाने इरफानला येत्या 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी इरफानला या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानले आहे. याआधी पोलिसांनी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (25), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (24), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (22), अतिब रशीद आदिल रशीद (22) आणि युसूफ खान बहादूर खान (44) या आरोपींना अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या