JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लग्नाच्या सहा महिन्यातच तरुणी बॉयफ्रेंडसोबत फरार; म्हणाली, पुस्तक देऊन येते अन्...

लग्नाच्या सहा महिन्यातच तरुणी बॉयफ्रेंडसोबत फरार; म्हणाली, पुस्तक देऊन येते अन्...

एका तरुणाने त्यांच्या मुलीचे महाविद्यालयातून अपहरण केल्याचा दावा मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुजफ्फरपुर, 6 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विवाहबाह्य संबंधातूनही अनेक भयानक घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका नवविवाहित तरुणीने असं पाऊल उचलले की तुम्हीही वाचून थक्क व्हाल. लग्नाला अवघ्या 6 महिन्यांतच मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमधून समोर आली आहे. ही तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंडची भेट ही कॉलेजमध्ये झाली होती. दरम्यान, लग्नानंतर ती माहेरी आली होती. यावेळी मैत्रिणीला पुस्तक देण्याच्या बहाण्याने ही तरुणी निघून गेली आणि परत आलीच नाही. तिने आपल्या प्रियकराला बोलावले आणि ती त्याच्यासोबत फरार झाली. ही घटना समोर आल्यानंतर परिवारात मोठी खळबळ उडाली. सध्या याप्रकरणी मुलीच्या सासरच्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. हे संपूर्ण प्रकरण साक्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात तरुणीच्या नातेवाईकांनी एका तरुणावर अपहरणाचा आरोप करत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. तिच्या मुलीचे कोणीतरी अपहरण केले आहे, असे मुलीच्या आईचे म्हणणे आहे. एका तरुणाने त्यांच्या मुलीचे महाविद्यालयातून अपहरण केल्याचा दावा मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. यापूर्वीही त्याने मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणी झाल्यानंतर समेट झाला. त्यानंतर मुलीचा विवाह वैशाली येथे झाला. शनिवारी मुलगी आपल्या माहेरी आली होती. त्यानंतर मैत्रिणीला काही पुस्तके देण्याचे सांगून ती घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही. हेही वाचा -  रक्ताच्या नात्याचा भयावह चेहरा, भावाचे शीर छाटले अन् मित्रांनी घेतला सेल्फी, पोलिसही झाले सुन्न बराच वेळ मुलगी घरी न पोहोचल्याने तिचा शोध सुरू झाला. मात्र, ती कुठेच सापडली नसल्याचे मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिचा मोबाईलही बंद आहे. त्यानंतर त्या तरुणाने मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले, असा दावा तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपी तरुण हा मुलीच्या सासरीही जात असे, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. फोनवर मुलीला त्रास द्यायचा. या प्रकरणाचा तपास करून आरोपी तरुणाला अटक करण्याची मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. दुसरीकडे स्थानिक लोकांनी हे संपूर्ण प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे, असे म्हटले आहे. तरुणीचे आरोपी तरुणासोबत प्रेमसंबंध होते, असा दावा केला जात आहे. यामुळे ती घरातून पळून गेली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या