नवी दिल्ली 23 मार्च : इटलीमधील एक भयंकर घटना समोर आली आहे. तरुणांमध्ये राग अनावर होण्याच्या वाढत्या प्रमाणाचा प्रत्यय या घटनेनं आला आहे. आई वडिलांसोबत झालेल्या वादामुळे (Dispute) रागात या मुलानं थेट आई वडिलांची हत्या केली आहे. तीस वर्षीय बॉडी बिल्डर बेनो साउथ टायरोलनं जन्मदात्या आई बापाची गळा दाबून हत्या (Man Killed Parents) केली. बेनोची आई लॉरा यांचा मृतदेह एडिजे नदीमध्ये आढळून आला आहे. तर, वडिलांचा मृतदेह अद्यापही हाती लागलेला नाही. बेनोनं आपला गुन्हा मान्य केला आहे. बेनोच्या वडिलांनी त्याला पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितलं होतं. बेनोनं असं करण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. बेनोचं असं म्हणणं आहे, की यावेळी माझ्या वडिलांनी मला असफल आणि बिनाकामाचा असं म्हणायला सुरुवात केली. मला त्यावेळी शांती हवी होती, त्यामुळे मी त्यांना शांत केलं. बेनोनं सांगितलं, की वडिलांच्या ओरडण्यामुळे तो आपल्या रुममध्ये निघाला मात्र वडील त्याच्या मागे मागे जात होते. बेनो आपल्या रुममध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याचे वडील त्याला उठवून त्याच्या वाट्याची घरातील कामं करण्यास सांगत होतं. बेनोनं सांगितलं, की हॉलमधून जात मी प्लॅस्टिक ट्रेमधून दोरीनं वडीलांना बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही दोघंही जमिनीवर कोसळलो. मला आठवतं, की मी त्याच दोरीनं वडिलांना गळा दाबला. यानंतर काही वेळातच माझी आई घरी पोहोचली. मी तिचीही गळा दाबून हत्या केली. बेनोनं सांगितलं, की आईनं मला काहीच म्हटलं नाही. ती आतमध्ये येताच आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि मी तिचा गळा दाबला. मी तिला शेवटचं बोललोदेखील नाही आणि तिचा मृतदेह नदीमध्ये फेकला. बेनोला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या तो बोलजानो तुरुंगात बंद आहे.