शिवपुरी, 14 मे : मारहाण केल्यामुळे आणि सगळ्यांसमोर मूत्र पाजल्यामुळे एका तरुणाने मृत्यूला कवटाळल्याची बातमी समोर आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामध्ये आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिन्ही आरोपींनी ताब्यात घेतलं आहे. अमोला पोलीस स्टेशनचे प्रभारी अमित चतुर्वेदी यांनी गुरुवारी सांगितलं की, विकास शर्मा नावाला मारहाण करून त्याला पुजेच्या तांब्यातून मूत्र पाजत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे कुटुंबातीलच मनोज कोळी, तारावती कोळी आणि प्रियंका कोळी यांच्याविरूद्ध आयपीसी कलम 306, 323, 505 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मृतक आणि सर्व आरोपी हे साजोर गावचे रहिवासी आहेत आणि या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. कोरोना चाचणीचे नियम बदलले; रुग्णांना घरी सोडण्याबाबत सरकारने घेतला नवा निर्णय दरम्यान, या तिन्ही आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली असल्याचे करैरा उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुदत्त शर्मा यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून मूत्र पाजण्याचे अमानवी कृत्य का केलं याचा पोलीस तपास करत आहेत. सुसाईड नोटमध्ये लिहिली कहाणी पोलीस अधिकारी चतुर्वेदी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, विकास शर्माच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली. बुधवारी सकाळी विकास घराजवळील देवीच्या मंदिरात पाणी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी गावच्या हातपंपांवर पाणी भरणाऱ्यावरून त्यांच्याच कुटुंबातील सदस्य मनोज कोळी, तारावती कोळी आणि प्रियांका कोळी याच्यासोबत त्याचा वाद झाला. यावेळी या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. आणि पुजेसाठी असलेल्या पाण्याच्या लोट्यातच त्याला मूत्र पाजण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याला कंटाळून आपण आत्महत्या केली असल्याचं त्यानं पत्रात म्हटलं आहे. लॉकडाऊनमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचा कडक पवित्रा, ‘सोमवारपासून एकही बस दिसणार नाही’