मुंबई, 25 फेब्रुवारी : मुंबईतील (Mumbai News) लालबागमधून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. लालबागमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय तरुणाने राहत्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या (Mumbai Suicide) केल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणाचं नाव श्लोक शशीकपूर आहे. ही व्यक्ती एका बँकेत senior vice president पदावर कार्यरत होते.
आताच ही बातमी उघड झाली आहे. एएनआयने यासंदर्भातील ट्वीट करून माहिती दिली आहे. अद्याप या आत्महत्येमागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बातमी अपडेट होत आहे.