रीवा, 09 एप्रिल: घरगुती हिंसाचाराच्या (Domestic Violence) घटना आपल्या देशात काही नवीन नाहीत. अनेक महिला या समस्येच्या बळी ठरत आहेत. दरम्यान एका SDO ने त्याच्या सुनेला तीन दिवस बंदुकीच्या धाकाखाली तीन दिवस घरात डांबून ठेवलं आहे. एवढच नव्हे तर तिच्या फोननंतर तिची सुटका करण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांवर या सासऱ्याने फायरिंग केलं आहे, एक गोळी त्यांच्या पायाला लागल्याची माहिती मिळते आहे. त्याने या व्यक्तीवर तीन गोळ्या झाडल्याची घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर देखील या SDO सुरेश मिश्राने गोळीबार केला आहे. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत.
मध्य प्रदेशमधील रीवा (Rewa, Madhya Pradesh) याठिकाणी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सुनेबरोबर या घरामध्ये केवळ तिचे सासरे आहेत. तिचा नवरा भोपाळमध्ये राहतो. ही घटना परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. (हे वाचा- महाराष्ट्रातील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय ) गुरुवारी दुपारी ही गोळीबाराची घटना घडली आहे. सुरेश मिश्रा यांचे घर रीवा शहरातील समान पोलीस ठाणे हद्दीत येतं. तीन दिवसांपासून बंदी असलेल्या त्यांच्या सुनेने वडील श्रीनिवास तिवारी यांना कळवताच ते तातडीने तिथे पोहोचले. सुरुवातीला त्यांनी आपल्या मुलीला सोडण्याचे आवाहन केले. मात्र त्यांना बदल्यात गोळी मारण्याची धमकी मिळाली. जेव्हा तिवारी यांनी तरी देखील आत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. गोळी लागताच ते त्याठिकाणी खाली कोसळले. काही नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात भरती केले आहे. मीडिया अहवालानुसार पोलिसांनी या घटनाक्रमाची माहिती दिली आहे. (हे वाचा- ठाण्यातील धक्कादायक प्रकार; व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला अटक ) दरम्यान मुलीचे वडील तर संजय गांधी रुग्णालयात उपचार घेत आहेत, पण त्याबरोबर जो कुणी मिश्रा यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यावर फायरिंग केलं जात होतं. पोलिसांनी देखील अर्धा किलोमीटर दूर लाउडस्पीकर वरून SDO ला त्याच्या सुनेला सोडण्याचं आवाहन केलं. लेटेस्ट अपडेट नुसार मिश्राला अटक करण्यात आली आहे.