JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / 10 वीची विद्यार्थिनी, Online Gameमधून प्रेम, प्रियकराला भेटण्यासाठी आतुर, पोहोचली तब्बल 2400किमी

10 वीची विद्यार्थिनी, Online Gameमधून प्रेम, प्रियकराला भेटण्यासाठी आतुर, पोहोचली तब्बल 2400किमी

ऑनलाईन गेमने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात इतके अडकवले की तुम्हालाही धक्का बसेल.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : आजच्या काळात ऑनलाईन गेम तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. पण या गेमने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात इतके अडकवले की, विद्यार्थिनी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तब्बल 2400 किलोमीडटरचा प्रवा करुन गेली. ती अंदमानहून थेट यूपीमधील बरेली येथे पोहोचली. अंदमान आणि निकोबार बेटांपासून बरेलीचे अंतर सुमारे 2400 किलोमीटर आहे. अंदमान आणि निकोबारमधील दहावीच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनी बरेलीच्या फरीदपूर परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला भेटण्यासाठी देशाच्या सर्वात दूरच्या टोकाला पोहोचली. विद्यार्थिनी प्रियकराला भेटण्यासाठी बरेलीला पोहोचली तेव्हा तेथील पोलिसांचे पथकही विद्यार्थिनीच्या शोधात यूपीत पोहोचले. अंदमान निकोबार पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून बरेली येथे तळ ठोकून मुलीचा शोध घेत होते. अखेर मोबाइल फोन ट्रेसिंगच्या आधारे पोलिसांना तरुण आणि तरुणीचा शोध लागला असला. पोलिसांचे पथक त्या विद्यार्थिनीला अंदमान निकोबारला घेऊन जात आहे. याबाबत माहिती देताना बरेलीचे एसपी (कंट्रीसाइड) राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, अंदमान आणि निकोबारचे पोलीस पथक बरेलीत आले असून त्यांनी त्या तरुण आणि तरुणीचा शोध घेतला आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. प्रियकराला भेटण्यासाठी झाली आतुर - बरेलीत पोहोचलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, काही काळापूर्वी ऑनलाईन गेम खेळत असताना तिची फरीदपूरमधील एका तरुणाशी घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे तिला कळलेच नाही. प्रियकराला भेटण्यासाठी दहावीची विद्यार्थिनी हतबल झाली आणि कोणालाही न सांगता प्रियकराला भेटण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून बरेलीला पोहोचली. हेही वाचा -  प्रेग्नंट बहिणीच्या मदतीला आलेल्या मुलीसोबत मेहुण्याकडून धक्कादायक कृत्य, अमरावती हादरलं! मुलीच्या शोधात अंदमान निकोबार पोलिसांचे पथकही विद्यार्थिनीच्या मागे बरेलीला पोहोचले. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांचे पथक विद्यार्थिनीच्या शोधात बरेलीमध्येच मेहनत घेत होते. विद्यार्थिनीच्या मोबाईल फोनच्या लोकेशनच्या मदतीने पोलीस पथकाने विद्यार्थ्याला लवकरच शोधून काढले. त्यानंतर अंदमान आणि निकोबार पोलीस दल आणि बरेली पोलीस पथकाने विभागीय कारवाई अंतर्गत विद्यार्थिनी आणि तरुणाची चौकशी केली. अंदमान निकोबार बेटावरून बरेलीला पोहोचलेली विद्यार्थिनी अल्पवयीन आहे तर तरुणाचे वय 21 आहे. विद्यार्थिनी आणि तरुण हे वेगवेगळ्या धर्माचे असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव बरेली पोलिसांनी दोघांची ओळख गोपनीय ठेवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या