JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पालकांनो, परिस्थिती हाताबाहेर; Online गेमसाठी पैसे कमी पडले; आईचा सोन्याचा हार-बाबांची चेनचं चोरली!

पालकांनो, परिस्थिती हाताबाहेर; Online गेमसाठी पैसे कमी पडले; आईचा सोन्याचा हार-बाबांची चेनचं चोरली!

मागे एकदा 13 वर्षीय मुलाने फ्री फायर गेममध्ये 40 हजार रुपये हरल्यानंतर तणावात गळफास लावून घेतला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 2 फेब्रुवारी: मध्यप्रदेशात (Madhya Pradesh News) ऑनलाइन गेमचे साइड इफेक्ट (Side effects of online games) वाढत असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये याचं जाळं वाढत असल्याचं दिसून आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाइल आला. त्यानंतर त्यातच ते अधिकतर वेळ घालवत आहे. मात्र आता हा सावधानतेचा इशारा आहे. वेळीच यावर आवर घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हं आहेत. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे फ्री फायर गेमच्या व्यसनामुळे दोन मुलांनी आपल्याच घरात चोरी (Two children steal from their own home due to addiction to free fire games) केली. यापैकी एका मुलाने आपल्या आईचा सोन्याचा हार आणि वडिलांची सोन्याची चैन चोरली होती. हे दागिने विकून पैसे मिळवण्याचा त्यांचा प्लान होता. सुदैवाने यापूर्वीच त्यांची चोरी पकडण्यात आली. या अल्पवयीन मुलांचे वय 16 आणि 12 वर्षे आहे. मोबाइल रिचार्ज करण्याचं सांगून या दोघांनी आपल्याच घरातून 20 हजारांहून अधिक पैसे खर्च केले होते. हे दोघेही मुले शेजारी राहतात. दोघांमध्ये मैत्री आहे. कोरोनादरम्यान दोघे एकत्रच ऑनलाइन क्लास करीत होते. क्लाससाठी पालकांनी दिलेल्या मोबाइलमध्ये ते फ्री फायर गेम खेळायचं शिकले. दोघांना या खेळाचं इतक व्यसन लागलं की, यासाठी ते घरातून पैसे चोरी करीत होते. हे ही वाचा- कॉलेजमधून येताच 12वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल; भंडारा जिल्हा हादरला गेममध्ये हत्यारं अपडेट करण्यासाठी लागतात पैसे… फ्री फायर गेममध्ये 10 मिनिटांचं युद्ध असतं. युजर्सना नवनवे हत्यारं खरेदी करण्याची संधी मिळते. फ्री फायर मित्रांसोबत मिळूनदेखील खेळता येऊ शकतो. टीमसोबत खेळणं युजर्सना जास्त आवडतं. गेम खेळणे आणि गेमची लेव्हल अपग्रेड करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. गेम खेळण्यापासून मुलांना असं रोखा.. काही कंपन्यांनी पॅरेंटल कंट्रोल अॅप जारी केला आहे. हे अॅप प्ले स्टोअरवरुन खरेदी करता येऊ शकतं. हे खरेदी करण्यापासून नीट तपासून पाहा. दुसरीकडे पालकांनी मुलांची गेम खेळण्याची वेळ निश्चित करून द्या. अर्ध्या तासाहून अधिक वेळ गेम खेळू देऊ नये. दुसरीकडे पालकांनी मुलांना वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. पैसे हरला म्हणून तणावात मुलाची आत्महत्या… यापूर्वी 30 जुलै 2020 रोजी छतरपूरमधील सागर रोड निवासी 13 वर्षीय मुलाने फ्री फायर गेममध्ये 40 हजार रुपये हरल्यानंतर तणावात गळफास लावून घेतला होता. ऑनलाइन क्लासदरम्यान त्याला फ्री फायर गेमचं व्यसन लागलं होतं. यात पैसे हरल्यानंतर त्याने एक नोट लिहून ठेवली होती. यात त्याने 40 हजार रुपये हरल्याचा उल्लेख केला होता. ऑनलाइन गेममुळे 13 जानेारी 2022 रोजी भोपाळमधील 11 वर्षांच्या मुलाने गळफास घेतला होता.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या