मुंबई, 13 डिसेंबर : दिल्लीत श्रद्धा वालकरच्या हत्याकांडासारखीच घटना कर्नाटकात घडली आहे. मुलाने बापाचीच हत्या करून मृतदेहाचे ३२ तुकडे केल्यानं पुन्हा एकदा देश हादरला आहे. कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यात एका व्यक्तीने वडिलांचीच हत्या करून ३२ तुकडे केल्याने खळबळ उडालीय. हत्या केल्यानतंर मृतदेह एका बोअरवेलमध्ये फेकून दिला होता. या हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने बोअरवेलमधून मृतदेहाचे तुकडे खोदून काढले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विठ्ठल कुलाल याला अटक केली आहे. गेल्या मंगळवारी विठ्ठल त्याच्या ५४ वर्षीय वडील परशुराम यांच्याशी उसाच्या शेतात पाणी न पाजण्यावरून वाद झाला होता. यावेळी परशुराम यांनी मुलाला मारहाण केली होती. यामुळेच नाराज झालेल्या आरोपी विठ्ठलने वडिलांच्या डोक्यावर लोखंडी सळीने वार केला. यामध्ये परशुराम यांचा जागीच मृत्यू झाला. हेही वाचा : आधी प्रेम, मग प्रेग्नेन्ट… गर्लफ्रेंड ऐकली नाही म्हणून थेट कहाणीचा The End, नक्की असं काय घडलं? पोलिसांनी सांगितले की, आरोपी विठ्ठलने हत्या केल्याची कबुली दिली आहे. वडील नेहमीच दारुच्या नशेत असायचे आणि मारहाण, शीवीगाळ करायचे. हे सगळं सहन करू न शकल्याने आपण हे कृत्य केल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं. मृत परशुराम यांना दोन मुलगे असून मोठा मुलगा आणि पत्नी हे मारहाणीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या मुलाने आणि पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. परशुरामच्या रोजच्या मारहाणीला, त्रासाला वैतागून दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय़ घेतला होता. या घटनेनंतर कुटुंबियांनी लहान मुलाला परशुराम यांच्याबद्दल विचारले तेव्हा त्याने हत्या केल्याचं सांगितलं. आई आणि मोठ्या मुलाने त्याला पोलिसांसमोर शरण जाण्यासही सांगितलं पण त्याने ऐकलं नाही. यानतंर कुटुंबियांनी पोलिसात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. हेही वाचा : लग्नात आलेल्या वऱ्हाडीने केलं भयानक कृत्य, औरंगाबादमधील धक्कादायक घटना दिल्लीत श्रद्धा नावाच्या मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले होते. हत्येतील आरोपी हा श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबने मे महिन्यात वादानंतर श्रद्धाची हत्या केली होती. त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे करून घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज रात्री हे तुकडे तो जंगलात फेकायला जायचा. सध्या आरोपी आफताब हा पोलिसांच्या ताब्यात आहे.