बंगळुरू, 24 नोव्हेंबर : कर्नाटकातील होसाकेरेहल्ली भागातील एका खासगी कॉलेजमध्ये भयानक प्रकार समोर आला आहे. कॉलेज परिसरातील मुलींच्या हॉस्टेलच्या शौचालयात कॅमेरा लावून एका विद्यार्थ्यानं मुलींचे 1200 अर्धनग्न व्हिडिओ शूट केले आहेत. हे व्हिडिओ करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढची कारवाई सुरू आहे. होसाकेरेहल्ली भागात असलेल्या एका खासगी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. शुभम आझाद नावाच्या विद्यार्थ्यानं मुलींच्या वसतिगृहात असलेल्या शौचालयात एक छुपा कॅमेरा बसवला. त्या कॅमेऱ्याद्वारे त्यानं मुलींचे अर्धनग्न अवस्थेतले 1200 व्हिडिओ शूट केले. कॉलेज प्रशासनानं जेव्हा कॉलेजमधल्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. याआधीही त्यानं असा प्रकार केला होता. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. मात्र त्याच्याकडून माफीचं पत्र दिल्यावर त्याला समज देऊन सोडून देण्यात आलं होतं. मात्र पुन्हा त्यानं असंच कृत्य केल्यानं आता पोलिसांनी शुभम आझाद याला ताब्यात घेतलंय. कॉलेजमधल्या एका प्राध्यापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याचा फोन जप्त केल्यावर त्यात पोलिसांना 1200 पेक्षा अधिक व्हिडिओ आणि फोटो मिळाले. आरोपीकडे आणखी एक फोन असून पोलिसांच्या मते त्यात आणखीही काही व्हिडिओ सापडू शकतात. आरोपी शुभमवर त्याच्या गर्लफ्रेंडचा अर्धनग्न व्हिडिओ तयार केल्याचाही आरोप आहे.
विदेशात जायचं स्वप्न पाहत होती तरुणी, ट्रॅव्हल एजंट्सने पाजली दारू, ड्रग्जच्या अतिसेवनाने घडलं भयानकवसतिगृहाच्या शौचालयात कॅमेरा बसवताना काही मुलींनी त्याला पकडलं होतं. मात्र तो पळून गेला होता. या घटनेची चौकशी पोलीस करत आहेत. त्या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी पी. कृष्णकांत यांनी सांगितलं, की “शुभम इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्यानं गोपनीयतेचा भंग करून मुलींचे व्हिडिओ आणि फोटो घेतले आहेत. हा आरोपी बिहारचा रहिवासी आहे. त्यावर त्यानं केलेल्या कृत्याच्या आधारे योग्य त्या कलमानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या आधारावर आम्ही पुढची चौकशी करत आहोत.” आरोपी शुभम यानं केलेल्या भयंकर कृत्यामुळे कॉलेजमध्ये चर्चा होते आहे. आरोपीबाबत व त्यानं केलेल्या कृत्याबाबत आणखी माहिती समजू शकलेली नाही. पोलीस त्यासंदर्भात तपास करत आहेत. मुलींच्या वसतीगृहात याआधीही असा प्रकार घडला होता, मात्र कॉलेज प्रशासनाकडून त्यावेळी ठोस कारवाई करण्यात आली असती, तर कदाचित पुन्हा असा भयंकर प्रकार घडला नसता.