JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Kanjhawala Accident: अंजली फुल नशेत गाडी चालवत होती, पण.. मैत्रीणीने सांगितली घटनेची आपबिती

Kanjhawala Accident: अंजली फुल नशेत गाडी चालवत होती, पण.. मैत्रीणीने सांगितली घटनेची आपबिती

Kanjhawala Accident Case: दिल्लीतील कांझावाला येथे झालेल्या या धक्कादायक कार अपघातात एक अतिशय धक्कादायक बाब म्हणजे कारला धडकल्यानंतर पीडित अंजली सिंग त्याच कारमध्ये अडकली, त्यावेळी तिची एक मैत्रीण निधीही तिच्यासोबत स्कूटीवर बसली होती.

जाहिरात

अंजलीच्या मैत्रीणीने सांगितली घटनेची आपबिती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 जानेवारी : देशाची राजधानी दिल्लीत असलेल्या कांझावाला येथे वर्षाच्या पहिल्याच दिवशी 20 वर्षीय अंजली सिंगचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे एका कारने अंजलीच्या स्कूटीला धडक दिली. त्यानंतर जवळपास 10 ते 12 किलोमीटर ती कारसोबत फरफटत गेली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अंजलीसोबत ही घटना घडली, त्यावेळी तिची एक मैत्रीण निधीही तिच्यासोबत स्कूटीवर बसली होती. या धडकेत तिलाही दुखापत झाली. मात्र, अंजलीची मदत करायचं सोडून ती घरी निघऊन आली. अशा वेळी एखादी मैत्रीण कशी काय सोडून जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले होते. यानंतर तिने मीडियासमोरही आपली बाजू मांडली आणि अशा प्रकारे घरी निघून येण्याचे कारणही सांगितले. या अपघाताची प्रत्यक्षदर्शी असलेल्या निधीने सांगितले की, “ती खूप मद्यधुंद अवस्थेत होती, मी तिला म्हटलं मी स्कूटी चालवते, पण तिने मला स्कूटी चालवायला दिली नाही. यावरून आमच्यात वादावादीही झाला होता”. निधी म्हणाली, ‘आमच्या गाडीला धडक बसली, त्यानंतर मी एका बाजूला पडले आणि ती गाडीखाली आली. त्यानंतर ती गाडीखाली कशात तरी अडकली. गाडी तिला फरफटत घेऊन गेली. मला भीती वाटत होती म्हणून मी तिथून निघून आले आणि कोणाला काही सांगितले नाही. वाचा - 4 नव्हे 12 किमीपर्यंत तरुणीला फरफटक नेलं; दिल्ली पोलिसांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा निधी सांगते की जेव्हा ती गाडीत अडकली तेव्हा तिने मला वाचवा, मला वाचवा असे ओरडली तरीही त्यांनी गाडी थांबवली नाही. मुलगी वाहनाखाली अडकल्याचे त्यांना माहीत होते. मात्र, तरीही त्यांनी वाहन थांबवले नाही. कार अपघातात बळी पडलेल्या अंजली सिंहचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टही मंगळवारी समोर आला आहे. डोक्याला, पाठीचा कणा आणि खालच्या अंगाला झालेली दुखापत आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या या प्राथमिक अहवालाचा दाखला देत पोलिसांनी सांगितले की, तिच्या प्रायव्हेट पार्टवर अशी कोणतीही जखम आढळली नाही, ज्यामुळे बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराची पुष्टी होईल.

पोलिसांनी अंजलीची मैत्रिण निधी हिचा जबाबही नोंदवला आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रत्यक्षदर्शींचे जबाब महत्त्वाचे पुरावे ठरतील, असे पोलिसांनी सांगितले. यासोबतच आणखी काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहेत, ज्यामुळे रविवारी रात्री घडलेल्या घटनांचा क्रम निश्चित करण्यात मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या