JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / #कायद्याचंबोला: ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर सारखा पाहायचा तरुणीचे स्टेटस, 5 वर्षांचा कारावास अन्..

#कायद्याचंबोला: ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर सारखा पाहायचा तरुणीचे स्टेटस, 5 वर्षांचा कारावास अन्..

तो प्रत्यक्ष भेटत नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे करत होता, त्याने स्वाती पुरती हादरली होती. त्यादिवसापासून ती एकही दिवस घराबाहेर पडली नाही.

जाहिरात

कायद्याचंबोला! ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर सारखा पाहायचा तरुणीचे स्टेटस, 5 वर्षांचा कारावास अन्..

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संदिप आणि स्वाती वर्षभर रिलेशनशीपमध्ये होते. या नात्यात संदिप गंभीर नव्हता. त्याचं आणखी एका मुलीशी सुत जुळलं होतं. याची कुणकुण स्वातीला लागली. तिने संदिपला याचा जाब विचारला. यावर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. परिणामी त्यांच्यात भांडणं झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी नातचं तोडलं. पुन्हा कधी एकमेकांचं तोंड पाहणार नाही, अशी वल्गना झाली. त्यानंतर एकमेकांचे फोननंबर डिलीट करण्यात आलं. सोशल मीडियावरही अनफ्रेंड, अनफोलो करण्यात आलं. जिंथं कुठं संबंध येऊ शकतो, त्या सर्व ठिकाणी ब्लॉक करण्यात आलं. पुढे काही महिने काहीच घडलं नाही. स्वातीला मोठा मानसिक धक्का बसला होता. कालांतराने ती तिच्या कॉलेजविश्वात रमली. पण, अचानक तिला काही गोष्टी जाणवू लागल्या. संदिप प्रत्यक्षात भेटत नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर पाळत ठेवतोय.

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


या गोष्टीने ती हादरून गेली, तिला भीती वाटू लागली. कशातच मन रमत नव्हतं. कॉलेजला जायचंही तिनं बंद केलं. मोबाईल तर पाहतच नव्हती. संदिप आयुष्यातून गेल्यानंतर तिनं कसंबसं पुन्हा आयुष्याची नव्याने सुरुवात केली होती. ज्या गोष्टीपासून दूर गेले, तीच आपला पाठलाग करत असल्याचं तिला वाटू लागलं. मुलीचं अचानक वागणं बदलल्याने आईवडिलांनाही भीती वाटली. काय करावं काही सुचेना? काही दुखतंय का? कोणी काही म्हटलं का? कॉलेजला का जात नाही? फक्त मला जाऊ वाटतं नाही. इतकचं उत्तर मिळत होतं. शेवटी स्वातीच्या आईवडिलांनी मनिषाला फोन लावला. मनिषा स्वातीची बालमैत्रीण. किमान तिच्याशी तरी मन मोकळं करेन, असं त्यांना वाटलं. फोन केल्यानंतर समजलं मनिषाच आज घरी येणार होती. कारण, दोन आठवड्यापासून स्वाती ना फोन उचलत, होती ना, मॅसेजला रिप्लाय देत होती. त्यामुळे तिलाही काळजी वाटत होती. आता स्वातीच्याच आईवडिलांचा फोन असल्याने मनिषा लगेच निघाली. वाचा - विवाह नोंदणीस गेलेल्या तरुणाचा झाला अपमान, पठ्ठ्याने नियमांच्या आधारे शिकवला धडा मनिषा स्वातीच्या घरी पोहचल्यानंतर थेट तिच्या बेडरुममध्ये गेली. स्वाती खिडकीत बसून एकटक खाली पाहात होती. मनिषा रुममध्ये आल्याचंही तिच्या लक्षात आलं नाही. मनिषाने आवाज दिल्यानंतर ती भानावर आली. आपल्या मैत्रीणाला पाहाताच तिचा बांध फुटला. ती थेट मनिषाच्या गळ्यात पडली. मनिषानेही तिला रोखलं नाही. तिला मनसोक्त रडू दिलं. थोड्या वेळाने शांत झाल्यानंतर मनिषाने तिला विचारलं काय झालंय? तू असं का वागतेस? काका-काकू किती काळजीत आहेत. आपल्या ग्रुपमध्येही रोज तुझी आठवण काढली जाते. त्यावर तिने मनिषाला घडला प्रकार सांगितला. अगं इतकचं ना. आधी नाही सांगायचं का? माझी मावस बहीण वकील आहे, आपण तिचा सल्ला घेऊ. मनिषाच्या आधाराने स्वातीच्या जीवातजीव आला. तिला आता बरं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी दोघी एकत्र मावस बहिणीला भेटायला गेले. स्वातीने पहिल्यापासून सगळी माहिती तिला सांगितली. पण, तिला वाटत होतं, की तो मला प्रत्यक्षात कधीही भेटला नाही किंवा त्रास दिला नाही. फक्त सोशल मीडियावर माझे प्रोफाईल चेक करणे, स्टोरी किंवा स्टेटस वारंवार पाहतो. यावर त्याला कशी शिक्षा होऊ शकते? नक्कीच शिक्षा होऊ शकते. अगं महिलांसाठी कायद्यात खूप तरतूद आहे. आपल्याला त्याबद्दल माहिती नसल्याने आपण कारवाई करत नाही. आयपीसी कलम 354 (ड) नुसार कोणत्याही स्त्रीचा चोरुन पाठलाग करणे गुन्हा ठरतो. स्त्रीला स्पर्श न करता केवळ तिचा कोणीतरी गुपचूप पाठलाग केल्याने तिला भीती वाटत असेल तर हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर नजर ठेवल्याच्या आरोपाखाली भादंवि 354 (ड) मध्ये आरोपीला पहिल्या गुन्ह्यासाठी 3 वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे, तर दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास आरोपीला 5 वर्षे शिक्षा आणि दंड ठोठावण्याची कायद्यात तरतूद आहे. वाचा - ऑनलाईन मागवलेला TV निघाला डॅमेज, तरुणाने कायद्याने 10 टक्के व्याजाने मिळवले पैसे वकील ताईने कायद्याची माहिती दिल्याने स्वातीचा आत्मविश्वास वाढला. पण, तक्रार करण्याआधी एकदा त्याला आपण इशारा देऊ असा सल्लाही वकील ताईने तिला दिला. यावर स्वाती तयार झाली. त्यानंतर त्यांनी संदिपला फोन लावून कायद्याचं ‘ज्ञान’ दिल्यानंतर त्याने माफी मागितली. पुन्हा असं करणार नसल्याचंही सांगितलं. ज्यावेळी स्वाती कायदेशीर सल्ला घेऊन ऑफिसबाहेर पडत होती. त्यावेळी तिच्या चेऱ्यावरील आत्मविश्वास सर्वकाही सांगत होता. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या