बाली, 11 जुलै : शक्तिशाली, श्रीमंत होण्यासाठी बरेच लोक कर्मकांड, जादूटोणा करतात. मग यासाठी जीव घ्यायालाही मागेपुढे पाहत नाही. मुक्या जीवांचाच नव्हे तर अगदी नरबळीही दिला जातो. हे सर्व फक्त भारतातच होत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर बिलकुल नाही. सध्या परदेशातील असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. विज्ञान, तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली असली तरी अंधविश्वास पूर्णपणे संपलेला नाही. किती तरी लोक अद्यापही काही गोष्टींना मानतात. यापैकी काही गोष्टींमुळे नुकसान होत नाही पण काही गोष्टी या अनेकांच्या जीव घेतात. असंच इंडोनेशियातील एक धक्कादायक प्रकरण. एका व्यक्तीने सुपरपॉवर मिळवण्यासाठी तब्बल 42 हत्या केल्या आहेत (Indonesian man murder 42 women to drink their saliva). अहमद सुराडजी असं या व्यक्तीचं नाव आहे. हे वाचा - ‘माझी, माझी’ म्हणत एका तरुणीसाठी आपसात भिडले 2 तरुण; पण समोर आलं तिचं भलतंच सत्य 59 वर्षांचा सीरिअल किलर अहमद सुराडजी आधी एक गुराखी होता. त्याच्या घराजवळील उसाच्या शेतात बरेच मृतदेह सापडले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने केलेल्या हत्यांचं धक्कादायक कारण समोर आलं. अटक केल्यानंतर त्याने सांगितलं की, त्याच्या वडिलांचं भूत त्याच्याजवळ आलं आणि स्वप्नात त्यांनी त्याला 70 महिलांची थुंकी पिण्यास सांगितलं. ज्यामुळे तो महाशक्तिशाली बनेल. पण त्यांनी त्यांची हत्या करण्याबाबत सांगितलं नव्हतं. पण यासाठी बरीच वर्षे लागतील असा विचार करून त्याने लवकरात लवकर सुपरपॉवर मिळवण्यासाठी स्वतःच हत्येचा मार्ग निवडला. असंही तो म्हणाला. हे वाचा - गुप्तांगात पेट्रोल ओतून प्लास्टिक पाईपने घरमालकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण; संतापजनक कारण समोर 1986 ते 1997 या कालावधीत त्याने हे हत्याकांड केलं. अटक होईपर्यंत त्याने 42 हत्या केल्या. यात महिला आणि लहान मुलींचाही समावेश आहे. काही मुलींचं वय फक्त अकरा वर्षे होते. यासाठी 14 वर्षांपूर्वी म्हणजे 10 जून 2008 रोजी मृत्यूदंड ठोठावण्यात आला. त्यानंतर भररस्त्यात त्याला गोळी मारून मृत्यू देण्यात आला.