JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / VIDEO - नवरदेवाचा अतिउत्साह बेतला मित्राच्या जीवावर; लग्नाच्या वरातीत जवानाचा मृत्यू

VIDEO - नवरदेवाचा अतिउत्साह बेतला मित्राच्या जीवावर; लग्नाच्या वरातीत जवानाचा मृत्यू

सुट्ट्यांमध्ये घरी आलेल्या जवानाला लग्नात नवरदेव मित्राच्या एका चुकीमुळे जीव गमावावा लागला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 23 जून : लग्न म्हटलं त्याचा आनंद, उत्साह सर्वांनाच असतो. काही लोकांचा हा उत्साह अतिउत्साहात बदलतो आणि त्यानंतर ते काय करतील याचा नेम नसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात नवरदेवाचा अतिउत्साह त्याच्या जवान मित्राच्या जीवावर बेतली आहे (Harsh gun firing by groom in wedding). नवरदेवाच्या एका चुकीमुळे लग्नाच्या वरातीत त्याच्या जवान मित्राचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण आहे (Army jawan died in wedding after groom firing). आर्मीत जवान असलेला बाबूलाल यादव काश्मीरमध्ये कार्यरत होता. काही दिवसांपूर्वीच सुट्ट्या मिळताच तो यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील महुआरी या आपल्या गावी आला होता. तिथं तो आपला मित्र मनीष मद्धेशियाच्या लग्नाला गेला. नवरदेवाची वरात निघाली होती. नवरदेव घोड्यावर बसला होता. तिथं जवळच बाबूलाही खाली उभा होता. घोड्यावर बसलेल्या नवरदेवाने उत्साहात बंदुकीतून हवेत गोळी झाडली. पण हीच गोळी बाबूलालला बसली आणि तो जमिनीवर कोसळला. हे वाचा -  भरमंडपात मेहुणीने केली नवरदेवाची धुलाई; नेमकं काय घडलं पाहा VIDEO या घटनेचा व्हिडीओ @Benarasiyaa ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या बंदुकीतून नवरदेवाने गोळी झाडली ती बंदूक जवान बाबूलालचीच होती.

संबंधित बातम्या

गोळी लागताच बाबूलालला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हे वाचा -  आश्चर्य! 4 वर्षांच्या चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू, मुलगा मात्र ठणठणीत; पाहा VIDEO एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट्सगंजमधील आशीर्वाद लॉनमध्ये हे लग्न होतं. जिथं जवानाची हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जवानाच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत आरोपी नवरदेव मनीषला अटक करण्यात आली आहे. त्याने ज्या बंदुकीतून गोळी झाडली ती बंदूक जप्त करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या