JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / महिलांसमोर प्रायव्हेट पार्ट दाखवून करायचा अश्लील कृत्य; शेवटी अंतर्वस्त्रात पेट्रोल टाकून लावली आग

महिलांसमोर प्रायव्हेट पार्ट दाखवून करायचा अश्लील कृत्य; शेवटी अंतर्वस्त्रात पेट्रोल टाकून लावली आग

अनेकदा त्याला समज देण्यात आली, पण तो ऐकत नव्हता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 8 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील (madhya pradesh news) बैतूल जिल्ह्यातील एक व्यक्ती गावात महिलांसमोर प्रायव्हेट पार्ट दाखवून अश्लील कृत्य करीत होता. अनेकदा त्याला याबाबत समज देण्यात आली होती. पण तो कोणाचच ऐकत नव्हता. शेवटी गावातील काहींनी त्याच्या अंडरवेअरमध्ये पेट्रोल टाकून आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. यात त्याचा खासगी भाग 20 टक्क्यांपर्यंत जळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एकावर उपचार सुरू आहे. ही व्यक्ती गावातील महिलांसमोर कपड्यांशिवाय उभी राहत होती. सोबतच त्यांची छेड काढत होता. यावर अनेकदा त्याची समजूत काढण्यात आली होती. शनिवारीदेखील अशीच घटना घडली होती. तो महिलांसमोर कपड्यांशिवाय उभा राहिला. पोलिसांनी पुढे सांगितलं, आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला यावेळी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो ऐकत नव्हता. गावातील महिलांनी अनेकांना याबाबत सांगितलं होतं. यानंतर गावातील सुदेश आणि कृष्णा यांनी त्याच्या अंतर्वस्त्रात पेट्रोल टाकून आग लावली. दुसरीकडे अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या