JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / चोरांची हिंमत वाढलीये; आधी घरात जेवले, मग बाथरूमला गेले, शेवटी एक चूक पडली महागात!

चोरांची हिंमत वाढलीये; आधी घरात जेवले, मग बाथरूमला गेले, शेवटी एक चूक पडली महागात!

चोर तब्बल 3 तास या घरात होते. दुपारी आले ते संध्याकाळीच गेले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Indore Thief Caught While Escaping: इंदूरमधील (Indore) लसूड़िया पोलीस ठाणे हद्दीतील एका बँक कर्मचाऱ्याच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोर तब्बल 3 तास या घरात होते. यादरम्यान चोरांनी घराच्या कानाकोपऱ्यात थुंकून ठेवलं होतं. सर्व वस्तू एकत्र करून एक चोर पळण्याच्या तयारीत होता. त्याने छतावरुन उडी मारली. यादरम्यान त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पळताना चोराचा पाय तुटला… इंदूरमध्ये सर्वाधिक चोरीच्या घटना लसुडिया पोलीस ठाणे हद्दीत पाहायला मिळत आहे. पुन्हा अशीच एक घटना महालक्ष्मीनगर येथून आली आहे. येथे बँक कर्मचारी सचिन देवडे यांच्या घरातून चोरांनी तब्बल 3 लाखांची चोरी केली. सचिन यांच्या घरातील काही जणं दिल्लीला गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन सकाळीच बँकेत निघून गेले. सायंकाळी जेव्हा ते कामावरुन परतले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं. ते घरी आले तर त्यांना काहीतरी संशयास्पद वाटलं. त्यांनी शेजारच्यांना एकत्र केलं आणि चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोर छतावरुन पळून जाऊ लागले. यादरम्यान एक चोर पळून गेला तर दुसऱ्या पळणं शक्य झालं नाही. जेव्हा त्याने छतावरुन उडी मारली तर त्याचा पाय तुटला. यानंतर स्थानिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं. सध्या चोरावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे ही वाचा- लिंग परिवर्तनाची इच्छा अपूर्णच; YouTube वरून हॉटेलच्या खोलीतच सर्जरी, भयावह अंत चोर आधी जेवले आणि मग केली चोरी.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळेत चोर घरात घुसले. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दिसून आलं आहे. तब्बल 3 तास चोर घरात होते. यादरम्यान त्यांनी अख्खं घर शोधलं. यावेळी चोरांनी अत्यंत किळसवाणं कृत्य केलं. त्यांनी पहिल्यांदा किचनमधील अन्न खाल्लं, बाथरूमला गेले..इथले नळ तोडले…इतकच नाही तर ठिकठिकाणी थुंकून अख्खं घर घाण केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या