कॅलिफोर्निया, 10 ऑगस्ट : सध्या पती-पत्नीमध्ये अनेक विषयांवरुन वाद होत असतात. तसेच अनेकदा काही कारणांवरुन एकमेकांवरील संशयावरुनही हे वाद होत असतात. इतकंच नव्हे तर वादाचे रुपांतर मारहाणीत किंवा हत्येत देखील होत असते. असंच एक पत्नीवरील संशयाचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. ज्याच्यामुळे पतीचा जीव वाचला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पत्नीने आपल्या पेयात विषारी पदार्थ मिसळल्याचा संशय एका डॉक्टरला आला होता. यानंतर त्याने गुपचूप घराच्या स्वयंपाकघरात कॅमेरा लावला आणि पत्नीला रंगेहात पकडले आहे. एका खटल्यासाठी न्यायालयात सादर केलेल्या काही कागदपत्रांवरून ही माहिती मिळाली आहे. ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील आहे. जॅक चेन (फिजिशियन) आणि त्वचा विशेषज्ञ डॉ. यू एमिली यू हे दोघेही 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. न्यूयॉर्क पोस्टने मिळालेल्या न्यायालयीन प्रतिज्ञापत्रानुसार, जॅक काही काळापासून आजारी होते. पत्नीने ड्रिंकमध्ये ड्रेन क्लीनिंग केमिकल ‘ड्रानो’ मिसळल्याचा त्यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी त्वचा विशेषज्ञ डॉ. यू एमिली यू यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी पती जॅक चेन यांनी गुपचूप कॅमेरा बसवला होता. जॅकने हे सीसीटीव्ही फुटेज इरविन पोलिसांना दिले आहे. यानंतर एमिलीला 4 ऑगस्ट रोजी तिच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्यांना सुमारे 24 लाखांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले. अहवालानुसार, जॅक यांचा दावा आहे की, पत्नी बराच काळापासून त्यांचा आणि दोन्ही मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होती. तसेच जॅक यांनी न्यायालयाला सांगितलंय की, जेव्हा एमिलीला राग येतो तेव्हा ती मुलांवर ओरडायला लागते. सामान्यतः एमिली एक चिनी म्हण वापरते ज्याचा अर्थ त्या लोकांसाठी ‘मरणे’ आहे. ती मुलांना शिवीगाळही केल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आता जॅकला घटस्फोट हवा आहे. हेही वाचा - पत्नीला पाहिल्यावर प्रेयसीच्या बेडमध्ये लपला पती, नंतर घडला फिल्मी ड्रामा, वाचा सविस्तर… 2011 मध्ये जॅक आणि एमिली या दोघांची भेट झाली होती आणि यानंतर पुढच्याच वर्षी दोघांनी लग्न केले. 2013 आणि 2014 मध्ये दोन्ही मुलांचा जन्म झाल्यानंतर त्याला एमिलीमध्ये बदल जाणवू लागले. दोन्ही मुलांचा खूप दिवसांपासून छळ होत आहे, दावा त्यांनी केला आहे.