JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / स्वत:ला मरायचं होतं पण त्याआधी काढला बायकोचा काटा, नंतर उचललं टोकाचं पाऊल

स्वत:ला मरायचं होतं पण त्याआधी काढला बायकोचा काटा, नंतर उचललं टोकाचं पाऊल

मद्यपान करून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यानंतर हा खून खेळ रंगल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालाघाट (मध्य प्रदेश), 23 मे : लॉकडाऊनमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली असून त्यानंतर त्याने स्वत: ला फाशी दिली. मद्यपान करून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यानंतर हा खून खेळ रंगल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बालाघाटच्या बिरसाची आहे. इथे एका 55 वर्षीय लोकरामने त्याच्या 50 वर्षांच्या पत्नीची हत्या केली. यानंतर त्यानेही स्वत: ला फाशी देऊन आत्महत्या केली. दहा वर्षापूर्वी या जोडप्याचं लग्न झालं होतं. पत्नीचं हे सातवे लग्न आणि नवरा लोकराम याचं दुसरं लग्न होतं. ‘रोज गिऱ्हाईकांसाठी बाहेर पडतो, नाहीतर मी मरेन’ सेक्स वर्करची धक्कादायक कहानी गुरुवारी दुपारपासून परिसरातील लोकांनी दोघांना पाहिलं नव्हतं. तेव्हा ही बाब उघडकीस आली. दुसर्‍या दिवशी शेजारच्या गावातून मृताच्या मोठ्या मुलाला बोलावून घराचा दरवाजा उघडला. पहिल्या खोलीत त्याच्या आईचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला तर दुसऱ्या खोलीत वडीलांचा मृतदेह आढळला. मुलगा रामकिशोर चौधरी याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. प्राथमिक तपासणीत असं दिसून आलं की, नवऱ्याने स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लॉकडाऊनमध्ये वकिल महिलेवर स्वत:च्याच घरी बलात्कार, आरोपी गळा आवळून पळाला पण… मुलगा म्हणाला की, हे वडिलांचं दुसरं लग्न होतं, तर मृत आहेचं हे सातवं लग्न होतं. दोघेही दहा वर्ष एकत्र होते आणि सध्या घराबाहेर बिरसा इथे राहत होते. बिरसा पोलीस स्टेशनचे प्रभारी रविकांत दहेरिया म्हणाले की, पती-पत्नीचा मृतदेह मराइटोला इथल्या घरात पडला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता आणि नवऱ्याचा मृतदेह घराच्या दुसर्‍या खोलीत टांगला होता. प्रथमदर्शनी घटनेचं कारण कौटुंबिक वाद असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. दोघांच्या शवविच्छेदनात मद्यपान केल्याची नोंद झाली आहे. त्यांनी सांगितलं की मृताचं घर आतून बंद होतं. पोलीस सध्या या प्रकरणाचा सविस्तरपणे तपास करत आहेत. कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार, पहिल्यांदाच एका दिवसात वाढले एवढे रुग्ण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या