गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 7 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तळेगावमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याने महाविद्यालयीन तरुणाचा खून केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आला - काल रात्री ही धक्कादायक घटणा घडली आहे. हा वीस वर्षीय तरुण इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पडसाद काल उमटले. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जातो असं सांगून प्रणव घरातून बाहेर पडला होता. हत्येपूर्वी प्रणव मित्रांसमवेत एका कट्ट्यावर बसले होते. तेंव्हा वीस जणांचा टोळका त्यांच्या दिशेने आला. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी धावू लागले. या टोळक्याने त्यांचा पाठलाग करून हल्ला केला. यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक तरुण जखमी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी रात्रीतच आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात अल्पवयीन मुलांचा आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ही समावेश आहे. तर या घटनेचे मूळ कारण अद्याप समोर आलेलं नाही. हेही वाचा - नोकरावर आला जीव, पित्याने केला विरोध; तरुणीचं बापासोबत भयानक कांड चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला दिली आयुष्यभराची शिक्षा - चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना काल (दि. 01) मंगळवारी रात्री येरवड्यात घडली. अंकिता अनिल तांबूटकर (वय 45, रा. दुर्गामाता मंदिरा जवळ, जय जवान नगर येरवडा) हिचा खून केल्याप्रकरणी आरोपी पती अनिल मनोहर तांबूटकर (वय 50) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पत्निवर पतीने तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली. ही घटना काल मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जय जवान नगर दुर्गा माता मंदिराजवळ घडल्याची माहिती पोलिसांना मीळाली होती. घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचताच अंकिता तांबूटकर ही महिला तिच्या घरामध्ये गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. चारित्र्याच्या संशयावरून पती अनिल याने चाकूने तिच्या तोंडावर, छातीवर व गळ्यावर वार करून खून केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. याप्रकरणी त्यांचा मुलगा अनिकेत याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती अनिल तांबूटकर विरुद्ध येरवडा पोलिसांनी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.