बल्लभगड, 9 मार्च : हरयाणातील (Haryana News) दयालपुर गावातील एका घराचं टाळं तोडून सोमवारी दुपारी दीड लाखांची कॅश आणि 10 लाखांच्या सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याचा (Crime News) प्रकार समोर आला. इतरच नाही तर चोराने घरात असलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यालाही सोबत नेलं. जेव्हा घरमालकाने घराची अवस्था पाहिली तर त्याला धक्काच बसला. त्याने तातडीने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. जर्मन शेफर्ड जातीचा होता कुत्रा… पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. यावेळी राहुलच्या घरात चोरी झाल्याचं समोर आलं. यावर त्याने सांगितलं की, सोमवारी त्यांची पत्नी दुकानात गेली होती आणि मुलं शाळेत होते. ते घराला टाळं लावून औषधं घेण्यासाठी बल्लभगड येथे गेले होते. परत आले तर घराचं टाळं तुटलं होतं आणि कपाटात ठेवलेलं सामान अस्ताव्यस्त झालं होतं. चोराने घरातून तब्बल दीड लाखांची कॅश आणि 10 लाख रुपयांच्या दागिन्याची चोरी केली होती. इतकच नाही तर जर्मन शेफर्ड या कुत्र्यालाही चोर आपल्या सोबत घेऊन गेले. सुरक्षेसाठी राहूलने जर्मन शेफर्डला घरीच ठेवलं होतं. हे ही वाचा- कुत्र्याचा 5 वर्षांचा मुलावर खतरनाक हल्ला, 100 टाके घालायला लागला दीड तास उपचारावर 20 हजार रुपये केले खर्च… राहुलने सांगितलं की, त्यांनी कुत्र्याचं नाव एलेक्सा ठेवलं होतं. साधारण 9 महिन्यांपूर्वी आपल्या मेव्हणीकडून त्यांनी एलेक्साला घेतलं होतं. गेल्या काही दिवसांपासून एलेक्सा आजारी होता. त्याच्या उपचारासाठी 20 हजार इतका खर्च आला होता. आता चोर घरातील सोनं-दागिने आणि कॅशसह कुत्र्यालाही घेऊन गेले.