JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Tihar Jail मध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा, हाणामारीत 15 कैदी जखमी

Tihar Jail मध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा, हाणामारीत 15 कैदी जखमी

तिहार तुरुंगाला देशातील सर्वात जास्त आणि अति सुरक्षित तुरुंग म्हटले जाते. (tihar jail) मात्र, येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे, तिहार तुरुंगात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 एप्रिल: तिहार तुरुंगाला देशातील सर्वात मोठा आणि अति सुरक्षित तुरुंग म्हटले जाते. मात्र, येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे, तिहार तुरुंगात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी झाली आहे. काय आहे नेमकी प्रकार? देशातील सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये पुन्हा एकदा हिंसक संघर्ष सुरू झाला आहे. या हिंसक संघर्षात सुमारे 15 कैदी जखमी झाले. यातील काहींवर अजूनही उपचार सुरू आहेत. कारागृहातील कैद्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत ही घटना घडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिहार प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील हिंसक संघर्षाची ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. यात कारागृह क्रमांक 8 आणि 9 मधील कैद्यांमध्ये हाणामारी झाली आणि या घटनेत 15 कैदी जखमी झाले आहेत. काही कैद्यांना प्राथमिक उपचारानंतर पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. तर उर्वरित जखमी कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरू आहेत. कारागृह प्रशासनाने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे वाचा- पुण्यामध्ये हे चाललंय काय? पोलीस अधिकाऱ्याला 25 लाखांचा गंडा, RTI कार्यकर्त्यासह 7 जणांवर गुन्हा याआधीही घडली अशी घटना तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये हाणामारी होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात तिहार तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेत सहायक कारागृह अधीक्षक आणि वॉर्डरही जखमी झाले होते. या झटापटीत चार कैदी गंभीर जखमी झाले होते. ही घटना कारागृह क्र. 4मध्ये झाली होती. यावेळी कैद्यांमध्ये सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना सहायक कारागृह अधीक्षक जखमी झाले. तर यानंतर दोनच महिन्यात तिहार तुरुंगात पुन्हा एका कैद्यांमध्ये संघर्ष झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या