JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / वडील आणि भावांचं कृत्य पाहून हादराल; क्षुल्लक कारणावरुन तरुणीला झाडावर लटकवून निघृणपणे मारहाण

वडील आणि भावांचं कृत्य पाहून हादराल; क्षुल्लक कारणावरुन तरुणीला झाडावर लटकवून निघृणपणे मारहाण

तरुणीचा भाऊ कारम, दिनेश, उदय आणि वडिलांनी तिला भरचौकात बांबूने मारहाण केली. यावेळी कोणीच तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. काहींनी याचा VIDEO शूट केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 3 जुलै : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) आलीराजपुरमध्ये अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीला तिचे भाऊ आणि वडिलांनी अत्यंत निघृणपणे मारहाण केली. ती घरात नसल्यामुळे भाऊ व वडील चिडले होते. ती पळून गेल्याची शंका आल्यानं त्यांनी तिला बेदम मारलं. यानंतर आरोपींनी तरुणीला झाडावर टांगून आणि बांबूने मारहाण केली. (father and brothers brutally beat the young woman by hanging her from a tree) तरुणीने वडील व भावाची माफी मागत होती, मात्र तरीही कोणीच तिचं ऐकलं नाही. आजूबाजूचे लोकदेखील तमाशा पाहात उभे राहिले. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 50 किमी अंतरावर घडली. येथील गावात राहणारी नानसी (19) जवळील दुसऱ्या गावात गेली होती. काही दिवसांपूर्वी नानसीचा पती मजुरी करण्यासाठी गुजरातला गेला होता. तो पत्नीला सासरीच सोडून गेला होता. यामुळे नाराज झालेली नानसी सासरी न सांगता आंबी गावात आपल्या मामाच्या घरी निघून गेली. ही बाब नानसीच्या माहेरच्यांनी कळली. यामुळे ते खूप नाराज झाले. त्यांना वाटलं की मुलगी घरातून पळून गेली. ते 28 जूनलो तिला फुटतालाब येथे घेऊन आले. यावरुन तिला खूप मारहाण केली. केवळ घरात न सांगता मामाकडे निघून गेल्याने तरुणीला इतकी मारहाण करण्यात आली होती. हे ही वाचा- मोठी बातमी: Video रेकॉर्ड करत पुण्यात सुप्रसिद्ध कला दिग्दर्शकाची आत्महत्या झाडावर लटकवलं, आणि जमिनीवर आदळलं नानसीचा भाऊ कारम, दिनेश, उदय आणि वडील केल सिंह निनामा यांनी नानसीला खोलीतून बाहेर काढलं. पहिल्यांदा घरात मारहाण केली. मारत मारत तिला शेतात आणलं. यानंतर दांडुक्याने मारहाण केली. तरुणी माफी मागत राहिलं, मात्र कोणीत तिचं ऐकलं नाही. इतकं मारूनही त्यांचं मन भरलं नाही. झाडावरुन तिला खाली उतरवलं आणि जमिनीवर पाडून अत्यंत निघृणपणे मारत राहिले. आजूबाजूचे लोकही तमाशा पाहत राहिले. काही लोकांनी याचा एक व्हिडीओ करून सोशल मीडियावर शेअर केला. तरुणीने याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी मारणाऱ्यांना अटक केली आहे. गेल्या वर्षीदेखील या जिल्ह्यात मुलींना मारहाण केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये सोंडवा जवळ मुलासोबत पळून जाण्याच्या संशयाने तरुणीला चौकात मारहाण करीत तिचे केस कापण्यात आले होते. याशिवाय चांदपूरा येथे भावोजी आणि मेव्हणीला मारहाण केल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या