पिंपरी, 14 नोव्हेंबर : राज्यातून दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छेडखानीला कंटाळून पुण्यात गुंडाच्या पत्नीने एका तरुणाचे लिंग कापल्याची धक्कादायक घटना समोर आलेली असतानाचा पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सासऱ्याने आपल्या सुनेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - तु मला खुप आवडतेस. तुझ्या नवऱ्याचे कर्ज फेडतो, असे म्हणत एका सासऱ्याने आपल्या सुनेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तसेच आपल्या या सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली. या धक्कादायक प्रकारानंतर तिने आपल्या पतीला सांगितले. तर त्यानेसुद्धा आपल्या वडिलांची पाठराखण केली आणि मला तुझ्यात रस नाही. तू त्यांची इच्छा पूर्ण कर, या संतापनजक शब्दात प्रत्यत्तर दिले. ही घटना 2018 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली. फिर्यादी महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध - मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे यांच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते. याप्रकाराला फिर्यादी महिलेने विरोध केला. मात्र, तिच्या पतीने तिला मारहाण केली तसेच खेड येथे राहण्यासाठी नेले. याठिकाणी फिर्यादीचे सासरे आले. यावेळी सासरा म्हणाला की, तुझ्या नवऱ्याला बाहेराचा नाद आहे. त्याच्यावर असणारे कर्ज तो फेडू शकत नाही. मी तुमच्या दोघांचे कर्ज फेडतो. तसेच त्याच्या नावावर जमीन करतो. मात्र, तु माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेव. तुझा नवरा आता तुझ्यासोबत संबंध ठेवणार नाही. असे म्हणत चुकीच्या पद्धतीने या नराधम सासऱ्याने फिर्यादी महिलेला स्पर्श केला. तसेच मनात लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले. याबाबत फिर्यादीने आपल्या पतीला सांगितले असता. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत माझा बाप माझे कर्ज फेडणार आहे. तु त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेव, असे निर्लज्ज शब्दात सांगितले. हेही वाचा - कुख्यात गुंडाच्या बायकोची काढली छेड, तिने असा घेतला बदला की तरुणाचे कापले लिंग दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे पीडित महिलेने या प्रकरणी पीडित रविवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पती आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.