JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लेकीच्या अपहरणाची खोटी तक्रार; पोलिसांकडून हैराण करणारा खुलासा

लेकीच्या अपहरणाची खोटी तक्रार; पोलिसांकडून हैराण करणारा खुलासा

पोलिसांनी 24 तासात या प्रकरणाचा खुलासा केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोंडा, 18 सप्टेंबर : नोएडामधून (Noida Crime News) अपहरण केलेली तरुणी आज गोंडा आणि नोएडा पोलिसांना सापडली आहे. यासाठी दोन्ही पोलिसांच्या टीमला सरकारने एक-एक लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही संपूर्ण घटना खोटी असल्याचं समोर आलं आहे. इज्जत वाचवण्यासाठी घरातील सदस्यांनी अपहरणाचा बनाव रचला होता. (False report of daughters abduction shocking revelation from police) मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसांपूर्वी मुलगी आपल्या प्रियकरासह फरार झाली होती. ज्यानंतर कुटुंबीयांनी आपली इज्जत वाचविण्यासाठी नोएडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला. गोंडा पोलिसांनी तातडीने कारवाई करीत टीमचं गठण केलं व प्रियकरासोबत पळून गेलेल्या तरुणीला ताब्यात घेतलं. हे ही वाचा- नोटबंदीनंतरही बनावट नोटांचा सुळसुळाट; महाराष्ट्रातील आकडा पाहून संताप होईल! आता नोएडा पोलीस तिला घेऊन नोएडाला रवाना झाले आहेत. अंशुमान तिवारी नावाच्या तरुणावर मुलीच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा आरोप केला आहे. मात्र आता नोएडा पोलिसांना खऱ्या घटनेचा खुलासा झाला. या प्रकरणात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्र यांनी सांगितलं की, बेपत्ता झालेल्या मुलीला ताब्यात घेण्यात आलं आहे. काही तासांच्या आत पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. यामुळे पोलिसांचं कौतुक करण्यात आलं होतं. त्याशिवाय त्यांच्या नावे 1 लाखांच्या बक्षीसाचीही घोषणा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र इज्जत वाचविण्यासाठी मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. मुलगी सापडल्यानंतर पोलिसांनी याचा खुलासा केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या