JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / कल्याणच्या लॉजमध्ये आखला स्मगलिंग केलेल्या नोटांचा प्लान; छोट्या व्यापारांना हेरुन साधणार होते डाव

कल्याणच्या लॉजमध्ये आखला स्मगलिंग केलेल्या नोटांचा प्लान; छोट्या व्यापारांना हेरुन साधणार होते डाव

कल्याण संकुलात बनावट नोटांची एक घटना समोर आली असून, पोलिसांनी 200 रुपयांच्या 1000 हून अधिक नोटा जप्त करून तिघांना अटक केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कल्याण, 25 जुलै : देशात पुन्हा एकदा बनावट नोटांचा वापर वाढल्याचं समोर येत आहे. अनेक राज्यात यावर कारवाई सुरू असून कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. अशीच एक घटना महाराष्ट्रातील कल्याण शहरात समोर आली आहे. बनावट नोटांच्या माध्यमातून छोट्या दुकानदारांची फसवणूक करण्याचा प्लॅन असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या टोळीचा संबंध  दिल्लीतील फसवणूक करणाऱ्यांशी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. काय आहे प्रकरण? या बनावट नोटांच्या तस्करांना कल्याण शहरातील निलम गल्ली संकुलातील एका लॉजमधून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पोलिसांनी 200 रुपयांच्या 1000 हून अधिक नोटा जप्त केल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या बनावट नोटांच्या सहाय्याने छोट्या व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा डाव होता. मोहम्मद आरिफ, सुरत पुजारी आणि करण रजक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. यामध्ये करण रजक हा कल्याणचा रहिवासी असून तो ऑटो रिक्षा चालवतो, दुसरा आरोपी सूरज पुजारी हा देखील कल्याणच्या पत्रीपुल येथे राहत असून हमाल काम करतो, तर तिसरा आरोपी मोहम्मद अरिफा उत्तर प्रदेश या राज्यातील रहिवासी आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या टोळीने दिल्लीतून ह्या बनावट नोट आणल्या होत्या. कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी ही माहिती माध्यमांना दिली. भाजप नेत्याच्या रिसॉर्टमध्ये देहविक्रय व्यवसाय; छापेमारीत 6 मुलं ताब्यात पोलीस ठाण्यापासून अवघ्या 2 किमी अंतरावर नोटांची छपाई पोलीस ठाण्यापासून अवघ्या 2 किमी अंतरावर असलेल्या एका घरात गेल्या वर्षभरापासून बनावट नोटा छापल्या जात आहेत. तरीही पोलिसांना याचा तपास नव्हता. येथून दिल्ली, कोलकाता, मुंबई, सुरत, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरूसह देशभरातील मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा खर्च करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या बैठकीत आजूबाजूच्या परिसरात बनावट नोटा छापण्याची चर्चा सुरू असताना दोन शिपायांच्या कानावर पडली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी सावध झाले. शनिवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास छापा टाकून घटनास्थळावरून 2 कोटी 74 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण बिकानेरचे आहे. देशभरात बनावट नोटा आल्या बिकानेरमध्ये छापलेल्या या नोटा राजस्थान व्यतिरिक्त नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू, पाटणा, गुवाहाटी, शिलॉंग, लुधियाना, चंदीगड, सुरत, अहमदाबाद, वृंदावन, बनारस, गाझियाबाद येथील हवाला व्यापाऱ्यांमार्फत बनावट नोटा पाठवण्यात आल्या आहेत. या शहरांमध्ये किती पैसे पोहोचले याचा हिशेब अद्याप सापडलेला नाही. ही कारवाई बिचवाल, जयनारायण व्यास कॉलनी, नोखा, लुंकरनसार पोलीस ठाण्याने केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या