नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 07 नोव्हेंबर : जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताची नाती एकमेकांच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली. घराच्या हिस्सेवाटणीत वडील आणि लहान भावावर मोठ्या भावाने चाकूने हल्ला केला. या प्रकरणी मोठ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पारडी इथंही घटना घडली. संजय देवचंद राखडे (31) आणि देवचंद राखडे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी संतोष देवचंद राखडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराच्या हिस्सेवाटणीवरुन झालेल्या वादात मोठ्या भावाने वडील आणि लहान भावावर भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला करून जखमी केलं. (पुणे : वाढदिवस साजरा करायला आलेल्या तरुणासोबत भयानक कांड, घटनेने खळबळ) दोन भावांमध्ये घराच्या हिस्सेवाटणीवरून वाद सुरू होता. हा वाद पुन्हा सुरू झाला, त्यात संतोषने आपल्या खिशातून भाजी कापण्याचा चाकू काढला आणि भाऊ संजय व वडील देवचंद यांच्यावर हल्ला केला. यात वडिलांच्या हाताला जबर दुखापत झाली तसंच संतोषच्या गालाला दुखापत झाली. याप्रकरणी मोहाडी ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि 324, 504 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मोहाडी पोलीस तपास करीत आहेत. अज्ञात वाहनाच्या धडकेत ड्रायव्हिंग स्कूल चालकाचा मृत्यू दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात तुळजापूर नळदुर्ग-महामार्गवर अज्ञात वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तुळजापूर शहरातील हेलिपॅडजवळ हा अपघात घडला. (हेही वाचा - नोकरावर आला जीव, पित्याने केला विरोध; तरुणीचं बापासोबत भयानक कांड ) विशाल कुलकर्णी असे मृत तरुणाचे नाव असून तो रात्री एक वाजताच्या दरम्यान मोटारसायकलने घराकडे निघाला होता. यावेळी एका अज्ञात वाहनाने विशाल कुलकर्णीच्या गाडीला धडक दिली. यात विशालचा जागीच मृत्यू झाला तर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनाने तिथून पळ काढला असून या प्रकरणी तुळजापूर पोलिसात अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.