JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मोठी बातमी: जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत अटकेत, संजय राऊतांच्या पत्नीसोबतचा आर्थिक व्यवहारही वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी: जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत अटकेत, संजय राऊतांच्या पत्नीसोबतचा आर्थिक व्यवहारही वादाच्या भोवऱ्यात

बेकायदेशीरपणे FSI ची विक्री, आर्थिक अफरातफर आणि संशयास्पद आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप असणाऱ्या प्रवीण राऊत यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 फेब्रुवारी: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) अटक (Arrest) केली आहे. 1034 कोटी रुपयांच्या आर्थिक फेरफारप्रकरणी (Money Laundering) त्यांना अटक झाली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची (HDIL) सहयोगी कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन्सच्या (Guruashish Constructions) संचालक मंडळावर आहेत. गोरेगावमधील एका प्लॉटच्या व्यवहारात एफएसआयचा घोळ केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक फेरफार करून पैसे लाटल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी ही अटक झाल्याचं सांगण्यात येत आहे.   काय आहे प्रकरण? गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचं काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1000 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.   संजय राऊत यांच्या पत्नीसोबत आर्थिक व्यवहार याच काळात प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी यांना 1 कोटी 60 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. त्यातील 55 लाख रुपये माधुरी यांनी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना बिनव्याजी कर्ज म्हणून दिल्याचं स्पष्ट झालं होतं. याच रकमेतून दादर पूर्वेत एक फ्लॅट खरेदी करण्यात आल्याचंही चौकशीतून पुढे आले होतं. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती.  गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडीकडे गेलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या