जबलपुर, 27 फेब्रुवारी : दारू पिऊन गाडी चालवणे गंभीर अपघाताचं कारण ठरू शकतं. दारूच्या नशेत एक रिक्षा चालकाचं कृत्य पाहून पोलिसांच्या अंगावर काटा उभा राहिला.
ही घटना मालगोदाम चौकापासून हाय कोर्ट चौकापर्यंत रात्री उशिरा झाली. रस्त्यावरुन रिक्षा चालवताना चालकाचं नियंत्रण बिघडलं होतं. काही अंतरावर गेल्यानंतर रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभी राहिली. यानंतर स्टेअरिंगवर डोकं ठेवून रिक्षा चालक शुद्ध हरपला. खूप जास्त दारू प्यायल्यामुळे तो शुद्धीत नव्हता. तेथून जाणाऱ्या तरुणाने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या रिक्षेकडे पाहिल आणि रिक्षेच्या जवळ गेला.
तरुण रिक्षेच्या जवळ गेल्यानंतर चालकाने खूप दारू प्यायल्याचं त्याच्या लक्षात आलं. रिक्षा चालकाने इतकी दारू प्यायली होती की, तो 100 वाहनाच्या पोलीस जवानाच्या एकही प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही. हे ही वाचा- बलात्कार पीडितेने दीड वर्षांच्या बाळाला जमिनीवर आपटलं;रडली म्हणून गेटबाहेर फेकलं स्टेअरिंगवर डोकं ठेवून चालक निपचित पडून राहिला होता. हा जवान पुढील 10 मिनिटं त्याला उठवण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र तरुणाकडून काहीच प्रतिक्रिया येत नव्हती. काही वेळाने अन्य रिक्षा चालक तेथे येऊन थांबले. त्यांनी सांगितलं की, या रिक्षा चालक व्यसनी आहे. जास्त दारू प्यायल्यामुळे त्याची शुद्ध हरपली होती. सर्वांनी धक्का देऊन रिक्षा रस्त्याच्या किनाऱ्यापर्यंत नेली आणि चालकाच्या नातेवाईकांना फोन करून याबाबत कळवलं. सुदैवाने या घटनेत कोणताही अपघात झाला नाही.