मुंबई 06 सप्टेंबर : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे घेऊन कॅश व्हॅनचा चालक फरार झाला आहे. त्यावेळी कॅश व्हॅनमध्ये जवळपास 3 कोटी रूपये होते. चालक व्हॅनसह हे पैसे घेऊन फरार झाला. वेगवेगळ्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी ही व्हॅन निघाली होती. मात्र, संधी मिळताच चालक ही व्हॅन घेऊन फरार झाला. रिक्षाचालक बनला चोर! 5000 कारची चोरी, हत्या, 3 बायका अन्.., 27 वर्षांची क्राईम फाईल वाचून व्हाल शॉक मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमवारी दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त विनोद मिश्रा आणि डीसीपी विशाल ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. गोरेगाव पश्चिम येथील पाटकर महाविद्यालयात युनियन बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये 1 वाजण्याच्या सुमारास बँकेचे कर्मचारी पैसे भरण्यासाठी आले होते. गाडी एटीएमजवळ पोहचताच कर्मचारी खाली उतरले आणि एटीएमकडे गेले. हीच संधी साधत चालक कॅश व्हॅनसह फरार झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, चालक व्हॅन घेऊन फरार झाला त्यावेळी गाडीमध्ये 3 कोटी रूपये होते. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताच संशय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. काही वेळाने पिरामल नगर येथे पोलिसांना ही व्हॅन आढळून आली. पोलिसांनी व्हॅन ताब्यात घेत तपासणी केली. यावेळी व्हॅनमधील एकूण रकमेपैकी काही रोकड गायब असल्याचं निदर्शनास आलं. व्हॅन घेऊन पळून गेलेला चालक सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.