JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / डॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले, नंतर घडला धक्कादायक प्रकार

डॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले, नंतर घडला धक्कादायक प्रकार

महिलेने स्वत: हा धक्कादायक प्रकार सांगितला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 23 जानेवारी : मध्य प्रदेशातील जबलपुरमध्ये (Jabalpur News) राहणाऱ्या कुरिअर बॉयने डॉक्टरच्या पत्नीवर बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. महिलेने सांगितलं की, पार्सल पोहोचवण्यादरम्यान कुरिअर बॉयसोबत मैत्री झाली. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दोन वर्षांपर्यंत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये ठेवलं. नंतर मात्र लग्नास नकार दिला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. एसआय आंकाक्षा शर्मा यांनी सांगितलं की, या भागात राहणारी 36 वर्षी महिला खासगी काम करते. तिच्या डॉक्टर पतीचा 2016 मध्ये मृत्यू झाला आहे. तिला 13 वर्षांची मुलगीही आहे. महिलेने पोलिसांना सांगितलं की, ब्लू डॉट कंपनीकडून ती कुरिअर मागवीत होती. यादरम्यान जबलपूरमध्ये कुरिअर कंपनीत नोकरी करणारा दीपक सिंह ठाकूरसोबत मैत्री झाली. मैत्री वाढल्यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झाले. महिलेने सांगितलं की, दीपक तिला भेटायला जबलपूरहून भोपाळला येत होता. हे ही वाचा- पिंपरी: पतीच्या निधनानंतर दिराने दाखवला खरा रंग, वहिनीच्या घरात बसवला CCTV अन्.. 1 जानेवारी 2017 मध्ये दीपकने तिला भेटायला न्यू मार्केट येथील कंचन लॉज येथे बोलावलं. येथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने महिलेला लग्नाचं वचन दिलं. यानंतर दीपक जबलपूरमधून भोपाळला महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. दोन वर्षांपर्यंत सोबत राहिल्यानंतर जेव्हा महिलेने दीपकवर लग्नाचा दबाव केला तर तो मागे हटला. यानंतर महिलेने टीटी नगर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सांगितलं की, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या