JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / गंमत म्हणून होणाऱ्या बायकोचा न्यूड फोटो सोशल मीडियावर टाकला, तरुणीने घेतला भयंकर बदला

गंमत म्हणून होणाऱ्या बायकोचा न्यूड फोटो सोशल मीडियावर टाकला, तरुणीने घेतला भयंकर बदला

विकास दोन वर्षांपासून एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 20 सप्टेंबर : कर्नाटकच्या बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बंगळुरूच्या एका डॉक्टरने गमतीमध्ये आपल्या होणाऱ्या बायकोचा न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. इतकंच नाही तर त्याच्या मित्रांनाही शेअर केला. याचा राग येऊन होणाऱ्या बायकोने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने 27 वर्षीय डॉक्टरची हत्या केली. डॉ. विकास राजन असे मृताचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  मूळचा चेन्नईचा असलेला डॉ. विकास राजन बीटीएम लेआउट परिसरात राहत होता. 10 सप्टेंबरच्या मध्यरात्री त्याच्यावर हल्ला झाला. त्याची होणारी बायको आणि तिच्या दोन साथीदारांनी मिळून हा हल्ला केला होता. 10 सप्टेंबर रोजी बेगुरजवळील न्यू मायको लेआउटमधील अन्य आरोपी सुशीलच्या घरी हल्ला झाला होता. यामध्ये विकास हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 14 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. विकासचा मोठा भाऊ विजय याच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यानंतर या हत्या प्रकरणाचा खुलासा झाला. आरोपीही बीटीएम लेआउटचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यानंतर पोलीस दुसऱ्या आरोपी सूर्याचा शोध घेत आहेत. सूर्या हा वास्तुविशारद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासने युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर दोन वर्षे चेन्नईमध्ये प्रॅक्टिस केली आणि चार महिन्यांपूर्वी बंगळुरूला आला. येथे तो फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झामिनेशन (FMGE) साठी कोचिंग घेत होता. विकास दोन वर्षांपासून एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांच्या घरच्यांच्या संमतीनेही त्यांचा साखरपुडाही झाला होता. विकासने एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्राच्या नावाने अकाऊंट तयार करून मंगेतरचा न्यूड फोटो अपलोड केला. तमिळनाडूतील काही मित्रांनाही त्याने हे फोटो पाठवले. 8 सप्टेंबर रोजी जेव्हा तरुणीचे इंस्टाग्रामवर तिचे फोटो पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. याबाबत तिने विकासला विचारणा केली. विकासने सांगितले की, त्याने हे केवळ मनोरंजनासाठी केले आहे. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. महिलेने तिचा मित्र सुशीलसोबत मिळून विकासला धडा शिकवण्याचा कट रचला. यानंतर तिने आपले दोन मित्र गौतम आणि सूर्या यांनाही सोबत घेतले. त्यानी रचलेल्या कटानुसार त्यांना विकासला मारायचे नव्हते. त्यामुळे त्याने विकासवर पाण्याची बाटली आणि हाताने हल्ला केला. विकास बेशुद्ध पडल्यावर त्याने तिला दवाखान्यात नेले. हेही वाचा -  लग्नाचे भुत डोक्यात; प्रेयसी प्यायली टॉयलेट क्लिनर तर विवाहित प्रियकराने काय केलं पाहा? होणाऱ्या बायकोनेच विकासचा भाऊ विजय याला मारहाणीची माहिती दिली होती. विकाससोबत मित्राच्या ठिकाणी गेल्याचे तिने विजयला सांगितले. दरम्यान, फोन आल्याने ती घराबाहेर गेली असता विकास आणि त्याच्या मित्रांमध्ये भांडण झाले. त्याने विकासला मारहाण केली. मात्र, पोलिसांच्या तपासात महिलेच्या सांगण्यावरूनच तिच्या मित्रांनी विकासवर हल्ला केल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलेसह सुनील आणि गौतम या दोन आरोपींना 16 सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या