JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / डॉक्टरांनी ज्युनिअर महिलेला कपडे काढायला लावले, प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्याची घृणास्पद शिक्षा!

डॉक्टरांनी ज्युनिअर महिलेला कपडे काढायला लावले, प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्याची घृणास्पद शिक्षा!

आरोपी डॉक्टरने मात्र यावर भलताच दावा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मार्च : अनेकदा लोक पद आणि सत्ताचे चुकीचा उपयोग करणं स्वत:चा अधिकार मानतात. आपल्या ज्युनिअरना डोअरमॅट समजून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. याच गर्वातून लोक अनेकदा असं काही काम करतात जे विसरणं वा माफ करणं अशक्य असतं. एका प्रतिष्ठित रुग्णालयाचे सीनियर डॉक्टरांनी ज्युनियर डॉक्टरला धडा शिकवण्याठी घृणास्पद शिक्षा दिली. ज्यावरुन डॉक्टरवर टीका केली जात आहे. डॉ.एडविन चंद्रहरन यांनी जू. डॉक्टर प्रॅक्टिस प्रेजेंटेशनदरम्यान योग्य उत्तर न दिल्यामुळे स्वत:चे कपडे काढण्यास सांगितले. आणि ही शिक्षा धडा म्हणून लक्षात ठेवण्यास सांगितली. घटना समोर आल्यानंतर डॉ.चंद्रहरन यांना निलंबित करण्यात आलं. या सर्व प्रकारात आरोपी डॉक्टर त्याच्यासोबत भेदभाव केल्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाला दोष देऊ लागला. दोन महिला डॉक्टरांसह प्रॅक्टिसच्या नावाखाली अश्लिल कृत्य डोरसेट (Dorset) मध्ये एका ट्रेनिंगदरम्यान एका प्रेज़ेन्टेशन प्रॅक्टिससाठी चंद्रहरनने ज्युनिअर महिला डॉक्टरांना आपल्या हॉटेलच्या खोलीत बोलावलं होतं. जेथे चुकीचं उत्तर दिल्यामुळे तिला अश्लिल शिक्षा देण्यास आली. या घटनेनंतर आणखी एक प्रकार समोर आलं, ज्यात पीडितेने सांगितलं, Consultant gynaecologist चंद्रहरन यांनी तिला मसाज करायलाही सांगितलं. यापूर्वीच आणखी एका महिला डॉक्टरांना एका कॉन्फरन्सदरम्यान त्यांनी जबरदस्तीने आपल्यासोबत हॉटेलचा रूम शेअर करण्यासाठी दबाव आणला आणि तिच्यासोबत अश्लिल कृत्य करीत वारंवार मसाज देण्याचा प्रयत्न केला. आणखी एका घटनेदरम्यान ज्युनिअर डॉ. हॉटेल रूममध्ये काम करीत होती, त्याचवेळी चंद्रहरनेन तिच्या मानेभोवती मसाज सुरू केला, तिने नकार दिला तरीही त्यांनी ऐकलं नाही. यानंतर तिने त्यांना कानाखाली मारलं. दोन्ही पीडित महिला डॉक्टरांनी याविरोधात आवाज उठवला आहे. हे ही वाचा- 7 दिवसांच्या बाळाला गोळ्या घालून छिन्नविछिन्न केलं; सख्ख्या बापाचच क्रूर कृत्य चोर तर चोर वर शिरजोर.. NHS डॉ एडविन चंद्रहरन यांना महिला डॉक्टरांसह लैंगिक अत्याचार प्रकरणात फेब्रुवारी 2020 मध्ये साउथ लंडनच्या सेंट जॉर्ज यूनिवर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्टमधून काढून टाकण्यात आलं आहे. (St George’s University Hospitals sacked from NHS Foundation Trust). येथे त्यांनी 15 वर्षांपर्यंत लेबर वॉर्डमध्ये काम केलं होतं. त्यांच्यासोबत भेदभाव केला जात असल्याचा (Accused of racial discrimination) आरोप त्यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या