JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सावधान! 5Gमुळं तुम्ही कंगाल तर होणार नाही ना? तज्ज्ञांनी दिला सावधतेचा इशारा, वाचा कारण

सावधान! 5Gमुळं तुम्ही कंगाल तर होणार नाही ना? तज्ज्ञांनी दिला सावधतेचा इशारा, वाचा कारण

5G च्या नावाखाली फसवणूक करणारे तुमचं खातं क्षणार्धात साफ करू शकतात. तज्ञांचं म्हणणं आहे की 5G लाँच झाल्यानंतर सिम स्वॅप फ्रॉड्स वेगानं वाढू शकतात. फसवणूक कशी होऊ शकते आणि ते कसे टाळावे ते जाणून घ्या

जाहिरात

5Gमुळं तुम्ही कंगाल तर होणार नाही ना? तज्ज्ञांनी दिला सावधतेचा इशारा, वाचा कारण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑक्टोबर: आजपासून देशामध्ये 5G सेवा लाँच झाली. 5G नेटवर्कमुळं येत्या काळात अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहे. 5G ला 4G पेक्षा 10 पट जास्त वेग मिळेल, असं म्हटलं जात आहे. अर्थात 5G लाँच झाल्यानंतर लोकांना याचा खूप फायदा होईल, परंतु यासोबतच आपण त्याचे काही तोटे देखील होऊ शकतात. 5G च्या नावाखाली फसवणूक करणारे तुमचं खातं क्षणार्धात साफ करू शकतात. द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, तज्ञांचं म्हणणं आहे की 5G लाँच झाल्यानंतर सिम स्वॅप फसवणूक झपाट्यानं वाढू शकतं. ते म्हणाले की, सिम स्वॅप फसवणूक टाळण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांना जागरूक करणं आवश्यक आहे कारण ग्राहकांना 5G सेवा वापरण्यासाठी सिम कार्ड अपग्रेड करणं आवश्यक आहे आणि हॅकर्स याचा फायदा घेऊ शकतात, ज्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते. सिम स्वॅप फसवणूक आणि नुकसान- वास्तविक, सिम स्वॅप फसवणूक तेव्हा होते, जेव्हा फसवणूक करणारे बनावट कॉल, फिशिंग इत्यादीद्वारे एखाद्या ग्राहकाची माहिती मिळवतात आणि नवीन सिम कार्ड जारी करण्यासाठी दूरसंचार सेवा प्रदात्याशी संपर्क करण्यासाठी मिळालेल्या माहितीचा गैरवापर केला जातो. सिमकार्ड जारी केल्यानंतर ग्राहकाकडे असलेलं जुनं सिम निष्क्रिय केलं जातं आणि त्या क्रमांकावरील सर्व नवीन कम्युनिकेशन एक्सेस स्कॅमरना प्राप्त होतं. यामुळं स्कॅमरना बँकिंग वन-टाइम पासवर्ड (OTP) सारख्या माहितीमध्ये प्रवेश करता येतो. ज्यावरून ते लोकांच्या खात्यातून सहजपणे पैसे चोरू शकतात. हिच परिस्थिती चोरीला गेलेल्या फोनच्या बाबतीत देखील होऊ शकते किंवा जेव्हा ग्राहक अज्ञात लिंकवर क्लिक करतात, ज्यामुळे स्कॅमर्सना रिमोटली सिम डुप्लिकेट करता येते आणि OTP मिळू शकतो. हेही वाचा:  5G सेवेमुळे आयुष्य 360 डिग्री बदलणार, तुम्हाला कसा होणार फायदा पाहा कंपन्या जनजागृती मोहीम राबवू शकतात- दूरसंचार विभागानं (DoT) 2016 आणि 2018 मध्ये अपग्रेडेशनच्या बाबतीत नवीन सिम कार्ड जारी करण्यासाठी ग्राहकांची स्पष्ट संमती मिळविण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया आणि पायऱ्या सुचवल्या आहेत. अहवाल सूचित करतात की विभाग प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वांवर काम करत आहे. DSK लीगलचे पार्टनर ऋषी आनंद म्हणाले की, “दुरसंचार कंपन्या ग्राहकांना वैयक्तिक आणि आर्थिक तपशील अन-वेरिफाइड स्त्रोतांकडे पाठवण्यापासून रोखण्यासाठी आणि सिम स्वॅप घोटाळ्याच्या बाबतीत उपलब्ध उपायांबद्दल माहिती देण्यासाठी जागरूकता मोहीम राबवू शकतात.”

सध्या सर्व दूरसंचार कंपन्या वेळोवेळी संदेश पाठवून ग्राहकांना अज्ञात क्रमांक/कंपन्यांकडून वैयक्तिक आणि आर्थिक तपशीलांच्या विनंतीपासून सावध राहण्याची सूचना करतात. ते प्लॅटफॉर्मची रूपरेषा देखील देतात जेथे ग्राहक सिम स्वॅप/अपग्रेडेशन विनंत्यासह पोहोचू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या