JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सीरिअल किलर डॉक्टरची धक्कादायक कबूली, 100 लोकांना मारलं आणि मृतदेह....

सीरिअल किलर डॉक्टरची धक्कादायक कबूली, 100 लोकांना मारलं आणि मृतदेह....

एखाद्याचा जीव वाचवू शकतात ते डॉक्टर असतात. पण याच डॉक्टरांच्या नावाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : डॉक्टर म्हटलं की देवाचं रुप आहे. एखाद्याचा जीव वाचवू शकतात ते डॉक्टर असतात. पण याच डॉक्टरांच्या नावाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. डॉक्टरच्या व्यवसायात लोकांना निर्घृणपणे ठार करणाऱ्या हैवान देवेंद्र शर्माविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिरियल किलर देवेंद्र शर्मा याने यापूर्वी कबूल केलं होतं की त्याने 50 लोकांच्या हत्येनंतर त्याने खूनांची संख्या मोजणं सोडलं होतं. पण आता त्याने पोलिसांना धक्कादायक कबूली दिली आहे. आतापर्यंत देवेंद्र शर्मा याने 100 हून अधिक लोकांचा बळी घेतला असून, यातील अनेकांचा मृतदेह त्याने यूपीमध्ये एका कालव्यात मगरीला खाण्यासाठी टाकला आहे. देवेंद्र शर्मा राजस्थानमध्ये डॉक्टर असताना तो अशा प्रकारे लोकांचा खून करायचा. गुंतवणूकीमध्ये एकदा फसवणूक झाल्यानंतर त्याने खूनाचा हा मार्ग निवडल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर त्याने अनेक डॉक्टरांसह किडनी प्रत्यारोपण रॅकेटही सुरू केलं. एवढेच नाही तर त्याने चोरी केलेली वाहनेही विकली. त्याची एक बनावट गॅस कंपनी असल्याचंही सांगण्यात येत आहे. 9 दिवसांनंतर कोरोना रुग्ण संसर्ग पसरवत नाही, संशोधकांचा नवा दावा लोकांचे मृतदेह फेकायच्या मगरीला खाण्यासाठी…. देवेंद्र त्याच्या गाडीसाठी कॅब चालकांना ठार मारायचा. दिल्लीहून यूपीला जाण्यासाठी ज्यांनी टॅक्सी बुक केली त्यांना लुटायचा आणि ठार मारायचा. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेशातील कासगंजच्या हजारा कालव्यात अनेक मृतदेह फेकले आहेत. या कालव्यात मोठ्या प्रमाणात मगरी असतात. भारतानंतर आता अमेरिका देणार चीनला सगळ्यात मोठा धक्का, ट्रम्प यांचा निर्णय डॉक्टरहून असा बनला हैवान आरोपी देवेंद्र शर्मा याला बुधवारी दिल्लीहून अटक करण्यात आली. 1984 मध्ये देवेंद्र शर्मा याने आयुर्वेदिक औषधात पदवी पूर्ण केली आणि राजस्थानमध्ये क्लिनिक सुरू केलं. त्यानंतर 1994 मध्ये त्याने गॅस एजन्सीसाठी एका कंपनीत 11 लाखांची गुंतवणूक केली. पण कंपनी अचानक गायब झाली. तोटा झाल्यानंतर त्याने 1995 मध्ये बनावट गॅस एजन्सी उघडली. मटका किंगचा मर्डर, ऑफिससमोरच गोळ्या झाडून केलं ठार एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची लूट करणाऱ्या शर्मा याने एक टोळी तयार केली. यासाठी तो ड्रायव्हरला ठार मारायचा आणि ट्रक चोरायचा. त्याने टोळीसह तब्बल 24 खून केले असल्याची कबूली दिली आहे. त्यानंतर देवेंद्र शर्मा किडनी प्रत्यारोपण टोळीत सामील झाला. प्रतिरोपणात सात लाखांच्या दराने 125 प्रत्यारोपण केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या