JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लिंग परिवर्तनाची इच्छा अपूर्णच; YouTube वरून हॉटेलच्या खोलीतच शस्त्रक्रिया, भयावह अंत

लिंग परिवर्तनाची इच्छा अपूर्णच; YouTube वरून हॉटेलच्या खोलीतच शस्त्रक्रिया, भयावह अंत

2019 मध्ये तरुणाचं लग्न झालं होतं. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजयवाडा, 27 फेब्रुवारी : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh News) नेल्लोरमधून एक अत्यंत हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथे दोन फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी YouTube व्हिडीओच्या मदतीने सेक्स रिअसाइनमेन्ट शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान 28 वर्षीय तरुणाला रक्तस्त्राव होऊ लागला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. नेल्लोरमधील एका खासगी हॉटेलमध्ये गुरुवारी कोणतीही वैद्यकीय दक्षता न बाळगता आणि मार्गदर्शनाशिवाय प्रजनन अवयवाची शस्त्रक्रिया (Sex change surgery) करण्यात आली. या प्रकरणात बीफार्माच्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर झाला संपर्क पीडित व्यक्तीला आपलं लिंग परिवर्तन करावयाचं होतं. यादरम्यान तो सोशल मीडियावरुन बी फार्मा विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. कमी पैशांमध्ये लिंग परिवर्तन आणि शस्त्रक्रिया करण्यात येईल असं त्याला सांगण्यात आलं. सेडसिव औषधांचा ओव्हरडोस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त रक्तस्त्राव आणि रक्त थांबवण्यासाठी दिलेल्या औषधांचा अतिरिक्त प्रमाणामुळे कामेपल्ली गावातील पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ज्या खोलीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, ती खोली अस्वच्छ असल्याचंही समोर आलं आहे. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थी घटनास्थळाहून फरार झाले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोलीत मृतदेह सापडल्यानंतर हा सर्व प्रकार कळाला. हे ही वाचा- बलात्कार पीडितेने दीड वर्षांच्या बाळाला जमिनीवर आपटलं;रडली म्हणून गेटबाहेर फेकलं 2019 मध्ये लग्न आणि 2020 मध्ये घटस्फोट पीडित तरुण हैद्राबादमधील मजूर होता. 2019 मध्ये काकाच्या मुलीसोबत त्याचं लग्न झालं होतं. मात्र एक वर्षाच्या आत 2020 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून विशाखापट्टनममध्ये तो एका ट्रान्सजेंडरच्या संपर्कात आला होता. हे दोघे नियमित व्हॉट्सअॅप चॅट करीत होते. पीडित व्यक्तीने मुंबईत जाऊन लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान फार्माच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शस्त्रक्रिया करता येत असल्याचं सांगितलं. कमी खर्चात शस्त्रक्रिया करून देऊ असंही त्यांनी वचन दिलं. मुंबईत जाण्यापूर्वीच व्यक्तीने येथेच सर्जरीसाठी परवानगी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या