प्रातिनिधिक फोटो
मुंबई, 08 मार्च: मागील काही काळापासून मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. कायदे कठोर करूनही अशा प्रकरणात घट होताना दिसत नाही. अशात बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका पोलिसानं आरोपीच्या नातेवाईकाकडे 37 लाखांची लाच मागितल्याचा (demand 37 lakh for not being accused in rape case) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) सापळा रचून एका पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक (Red handed arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. भरत मुंढे असं अटक केलेल्या 33 वर्षीय लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. तो सध्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक भरत मुंढे यानं आरोपी तरुणाच्या नातेवाईकाकडे 37 लाखांची मागणी केली. हेही वाचा- पुण्यात मध्यरात्री घडला थरार; डोक्यात दगड घालून जीवलग मित्राला जिवंत पेटवलं यातील तीस लाख रुपये पीडित मुलीला, पाच लाख रुपये स्वत:ला आणि 2 लाख रुपये वरिष्ठ पोलिसांना द्यायचे असल्याचं त्यानं सांगितलं. एवढे पैसे कुठून आणायचे? असा प्रश्न आरोपी तरुणाच्या नातेवाईकाला पडला होता. पण यावेळी त्यांनी पैशांचा बंदोबस्त होईल, असं सांगितलं. यानंतर आरोपी तरुणाच्या नातेवाईकानं याबाबतची लेखी तक्रार वरळीतील एसीबीच्या कार्यालयात दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकानं तक्रारीचा पाठपुरावा केला आणि सोमवारी सापळा रचून आरोपी पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली. हेही वाचा- Pune: जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचाच घोटला गळा; लिव्ह इन पार्टनरकडून GFचा खून एसीबीच्या पथकानं आरोपी पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढे याला तरुणाकडून सात लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडलं आहे. मुंढे याच्याविरुद्ध एसीबीनं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 आणि 7अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एसीबीचे अधिकारी आरोपीची कसून चौकशी करत आहेत. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी एवढी मोठी रक्कम मागितल्यानं पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.