JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / अभ्यास केला नाही म्हणून मुलीचे हातपाय बांधून कडक उन्हात बसवले; निर्दयी आईची शिक्षा

अभ्यास केला नाही म्हणून मुलीचे हातपाय बांधून कडक उन्हात बसवले; निर्दयी आईची शिक्षा

दिल्लीमधील एका महिलेने आपल्या मुलीला शिक्षा देताना क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या. या महिलेने आपल्या मुलीचे हात-पाय बांधून तिला घराच्या छतावर कडक उन्हात (Mother ties daughter and put her on rooftop) बसवले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जून : अभ्यास केला नाही म्हणून कित्येक वेळा पालक आपल्या मुलांवर रागवतात. काही पालक प्रसंगी हातदेखील उचलतात. मात्र दिल्लीमधील एका महिलेने आपल्या मुलीला शिक्षा देताना क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या. या महिलेने आपल्या मुलीचे हात-पाय बांधून तिला घराच्या छतावर कडक उन्हात (Mother ties daughter and put her on rooftop) बसवले होते. उन्हाचे चटके खाणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ व्हायरल (Delhi girl on rooftop) झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत याबाबतचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी जर ही महिला दोषी आढळली, तर तिला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय आहे प्रकरण? दिल्लीच्या खजूरी खास भागातील तुकमीरपूर येथे एका महिलेने आपल्या मुलीचे हात-पाय बांधून तिला घराच्या छतावर (Delhi mother punishes daughter for not doing homework) बसवले होते. कडक उन्हामध्ये छतावर बसलेल्या या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Delhi girl on roof) झाला. यानंतर सर्वच स्तरातून या आईवर टीका होऊ लागली. मुलीने होमवर्क केला नाही, म्हणून आपण केवळ पाच मिनिटांसाठीच तिला वर ठेवले होते, असं तिच्या आईचं म्हणणं आहे. याप्रकरणी सध्या पोलीस तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या महिलेवरील आरोप सिद्ध झाल्यास तिला योग्य ती शिक्षा दिली जाईल. ( कॅन्सरवर 100 टक्के परिणामकारक ठरणारं औषध सापडलं? वाचा तज्ज्ञांचं मत ) मुलांवरील अत्याचारासाठी मोठी आहे शिक्षा लहान मुलांना अशा प्रकारच्या अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी जुवेनाईल जस्टिस अ‍ॅक्टची (Juvenile Justice Act) तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यानुसार, जर कोणी एखाद्या अल्पवयीन मुलाला मारहाण केली, किंवा विनाकारण त्याच्यावर हल्ला केला तर अशा व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा (Clauses in Juvenile Justice Act) होऊ शकते. मारहाण करणारी व्यक्ती जर लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेमध्ये काम करत असेल, तर तिला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा एखाद्या व्यक्तीने केलेल्या मारहाणीत लहान मुलाला अपंगत्व आल्यास, किंवा मानसिक धक्का बसल्यास अथवा लहान मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास आरोपीला तीन ते 10 वर्षे तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते. जर एखादी व्यक्ती लहान मुलांकडून भीक मागण्याचे काम करवून घेत असेल, तर तिला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. तसेच, भीक मागण्याच्या कामी लावण्यासाठी जर लहान मुलाला अपंग केले, तर त्यासाठी आरोपीला सात ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. जगभरातील 63 देशांमध्ये असे कायदे लहान मुलांवरील अत्याचारांविरोधातील कायदा पहिल्यांदा स्वीडन देशात लागू करण्यात आला होता. त्यानंतर फिनलँडमध्ये असा कायदा लागू केला गेला. सध्या कोरिया, जपान, आयर्लंड, आईसलँड, जर्मनी, नॉर्वे, ऑस्ट्रिया, युक्रेन अशा एकूण 63 देशांमध्ये (Countries with Juvenile Justice Act) अशा प्रकारचे कायदे लागू आहेत. कित्येक देशांमध्ये तर स्वतःच्या मुलांवर हात उगारण्यासाठीही शिक्षा होऊ शकते. …तर होणार नाही शिक्षा जुवेनाईल जस्टिस अ‍ॅक्टनुसार, जर आई-वडिलांनी मुद्दाम आपल्या मुलांवर अत्याचार केला नसेल; आणि केवळ परिस्थितीमुळे मुलांना त्रास सहन करावा लागला असेल, तर मात्र आई-वडिलांना कोणतीही शिक्षा होत नाही. दिल्लीमधील प्रकरणातही जर असे सिद्ध झाले, की महिलेने आपल्या मुलीसोबत जे केले ते मुद्दाम नव्हते केले, तर तिला कोणतीही शिक्षा देता येणार नाही. अर्थात, पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या