बिलासपूर, 21 नोव्हेंबर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अल्पावधीत श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीला जीव गमवावा लागला. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानंतर स्वत:चे 11 लाख रुपये परत घेण्यासाठी गेलेल्या त्या तरुणीचा मित्रानेच गळा दाबून खून केला. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून नंतर 4 दिवस मृतदेह कारमध्ये लपवला. दररोज सकाळ, सायंकाळ तो मृतदेहावर परफ्यूम मारायचा, कारमध्ये सेंटेड उदबत्तीही लावत होता. मृतदेह सडून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात बिलासपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिल्लीतील बहुचर्चित श्रद्धा वालकरच्या हत्याकांडाची देशभरात चर्चा होत असतानाच छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील प्रियांका सिंह या तरुणीचा मित्राकडून खून झाल्याचं समोर आलं आहे. प्रियांका दुर्ग-भिलाई येथील रहिवासी होती. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ती बिलासपूर येथील टिकरापारा येथील हॉस्टेलमध्ये राहत होती. अभ्यासासह ती शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करत होती. यातूनच तिची ओळख मेडिकल दुकानाचा मालक व शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या आशिषसोबत झाली. त्यानंतर दोघेही एकत्रित शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होते. परंतु शेअर मार्केटमध्ये मोठा फटका बसल्याने प्रियांका तिचे 11 लाख रुपये मागण्यासाठी मेडिकलमध्ये गेली होती. तिथं तिनं आरडाओरडा सुरू केला. आशिषनं तिला दुकानात बोलावलं व शटर बंद करून तिचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला. श्रद्धाचे शीर शोधण्यासाठी तलाव उपसणार; शरीराचे 17 तुकडे हाती, उद्या खरी परीक्षा मृतदेह कारमध्येच ठेवला दुकानात प्रियांका आणि आरोपी आशिष यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. आशिषनं गळा दाबून तिला मारून टाकलं. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे त्याला समजत नव्हतं. सुरूवातीला त्यानं मृतदेह पॉलिथीनमध्ये पॅक केला व नंतर तो कारमध्ये ठेवला. मृतदेह फेकण्याची त्याची हिम्मतच झाली नाही. मृतदेहाला त्यानं घरी आणले व गॅरेजध्ये लपवून ठेवलं. परंतु, चार दिवसानंतर सर्वत्र दुर्गंधी सुटली होती. 15 नोव्हेंबरपासून प्रियांका होती बेपत्ता प्रियांका मागील चार दिवसांपासून म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. तिचे कुटुंबीय शोध घेत होते. पण तिची माहिती मिळालीच नाही. त्यानंतर प्रियांकाचे वडिल बृजेश सिंह मुलगा हिमांशूला सोबत घेऊन बिलासपूर येथील शहर कोतवालीत गेले आणि त्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला. नंतर आशिषनंच प्रियकांचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं. मृतदेह लपवण्यासाठी आरोपीनं केलेलं कृत्य पाहून पोलीसही चक्रावून गेले होते. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे.