JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लहानपणीचा खेळ ठरला मृत्यूचा फास; पहिलीच्या चिमुरडीने तडफडत तडफडत सोडला जीव

लहानपणीचा खेळ ठरला मृत्यूचा फास; पहिलीच्या चिमुरडीने तडफडत तडफडत सोडला जीव

या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 22 डिसेंबर : एखाद्या अपघातात लहान मुलांचा बळी गेल्याचं किंवा ते गंभीर जखमी झाल्याचं आपण ऐकतो, पाहतो. खरं तर काही वेळा अजाणतेपणातून अशा घटना घडत असतात. उत्तर प्रदेशात अशाच एका दुर्घटनेत एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. लाकडाच्या पेन्सिलचं साल श्वासनलिकेत अडकून बसल्याने ही घटना घडली. लहान मुलीच्या मृत्युमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. `अमर उजाला`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हमीरपूर येथे लाकडाच्या पेन्सिलचं साल घशात अडकून एका लहान मुलीचा तडफडून मृत्यू झाला आहे. खरं तर लहान मुलांकडे पालकांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं असतं. पेन किंवा पेन्सिलचा वापर ते सावधगिरीनं करतात की नाही, हे पाहणं आवश्यक असतं. कारण यामुळे मुलांच्या डोळ्याला जखम होऊ शकते. बेडवर पेन्सिल किंवा पेन उघडं पडलं असेल तर त्याचं टोक टोचूनदेखील जखम होऊ शकते. लहान मुलांना कोणतीही गोष्ट उचलून तोंडात घालण्याची सवय असते. त्यामुळे पालकांनी त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तीन बायकांनंतर उर्वशीसोबत लिव्हइनमध्ये होता रियाज, ब्रँडेंड सँडलमुळे गूढ उकललं दरम्यान कोतवाली परिसरातील पहाडी वीर गावातील रहिवासी नंदकिशोर यांनी या घटनेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ``बुधवारी सायंकाळी माझा मुलगा अभिषेक (वय 12), मुली अंशिका (वय 8) आणि अर्तिका (वय 6) हे घराच्या टेरेसवर अभ्यास करत होते. होमवर्क करतेवेळी आर्तिका कटर तोंडात धरून पेन्सिलला टोक करत होती. त्यावेळी पेन्सिलीचं साल कटरमधून श्वासनलिकेत जाऊन अडकलं.`` तीव्र वेदनांमुळे आक्रोश करत अर्तिका जमिनीवर लोळू लागली. त्यानंतर कुटुंबीय तिला सीएचसीमध्ये घेऊन गेले. पण तिथं पोहोचल्यावर डॉ. सत्येंद्र यादव यांनी अर्तिकाला मृत घोषित केलं. अर्तिका गावातील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत होती. या घटनेमुळे तिची आई अनिताला शोक अनावर झाला आहे. ``कुटुंबियांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला,`` अशी माहिती डॉक्टरांनी दिली. `सीएचसी`चे डॉ. सत्येंद्र कुमार यादव म्हणाले, ``अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी लहान मुलांकडे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. काही मुलं झोपून जेवतात किंवा पाणी पितात. मात्र ही गोष्ट जीवघेणी ठरू शकते. श्वासनलिकेत अन्न किंवा पाणी अडकून प्रसंगी मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मुलांना अशा कृती करण्यापासून रोखलं पाहिजे.`

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या