अश्विनी खांडेकर
अमरावती, 3 डिसेंबर : अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुन नगरच्या रत्नदीप कॉलनी संकुलात राहणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह तिच्याच घरावरील पाण्याच्या टाकीत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. अश्विनी गुणवंत खांडेकर असं या तरुणीच नाव आहे. ती घरातून बेपत्ता होती. या प्रकरणी तिच्या भावाने पोलिसात तक्राद दिली होती. पोलिसांसह तिच्या कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरू होता. मात्र आज अचनाक अश्विनीचा मृतदेह तिच्याच घरातील पाण्याच्या टाकीत आढळू आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता असल्याची तक्रार घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अश्विनी ही अभियंता होती. तीचे वडील गुणवंत खांडेकर हे शिक्षक होते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अश्विनी ही आपला भाऊ आणि आईसोबत त्यांच्या अमरावतीमधील अर्जुन नगरच्या रत्नदीप कॉलनी संकुलात राहात होती. ती बेपत्ता होती. या प्रकरणात तिच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र आज अश्विनीचा मृतदेह पण्याच्या टाकीत आढळून आला आहे. घातपाताचा संशय दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन तासानंतर अश्विनीचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अश्विनीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.