अकोला, 12 मार्च: आई आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. अकोल्यातील एका आईने आपली जमीन मुलीच्या नावावर करून दिल्यानंतरही तिला जीव गमवावा (Murder in Akola) लागला आहे. मुलीच्या नावावर जमीन केल्यानंतर झालेल्या आर्थिक वादातून (land and financial disputes) मुलीने आपल्या सख्ख्या आईची दगडावर आपटून हत्या (daughter killed mother) केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरुबाई काशीनाथ कांडेलकर असं या घटनेतील मृत महिलेचं नाव आहे. अकोल्यातील गौररक्षण रोड परिसर या दुर्दैवी हत्येनं हादरला आहे. याप्रकरणी आरोपी मुलगी कविता दिनकर बायस्कर हिने आपल्या आईची दगडावर आपटून हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपी मुलीनं आई दगडावर पडली असल्याचा बनाव रचला आहे. पण पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला सरुबाई काशीनाथ कांडेलकर यांना एकूण तीन मुली आहेत. त्यांनी त्यांची सर्व संपत्ती, जमीन आपल्या तिन्ही मुलींच्या नावे करून दिली. तर आरोपी मुलगी कविताच्या नावावर 7 गुंठे अधिक करून दिले होते. यानंतर कविताने ही जमीन विकली. तेव्हा आईने या जमीन विकलेल्या पैशातून आपल्याला 1 लाख रूपये द्यावेत अशी मागणी केली. परंतु आरोपी मुलगी आईला 1 लाख रूपये देण्यास तयार झाली नाही. यातूनच त्यांचा वाद वाढत गेला. त्यामुळे संतापलेल्या कविताने आपल्या आईची दगडावर आपटून हत्या केली आहे. (वाचा - गजबजलेल्या भागात युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या, शहरात खळबळ ) त्यानंतर आरोपी कविताने आपली आई दगडावर पडून तिचा मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला. याप्रकरणी पोलीस तपास करत असताना त्यांना मुलगी कवितावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी मुलीची कसून चौकशी केली. तेव्हा हे संपत्तीचं गौडबंगाल समोर आलं आहे. तिने या हत्येची कबुली दिली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.